वारी वो वारी । देई का गा मल्हारी ।

त्रिपुरारी हरी । तुझे वारीचा मी भिकारी ।

वाहन तुझे घोड्यावरी । वरी बैसली म्हाळसा सुंदरी ।

वाघ्या मुरळी नाचती परोपरी । आवडी ऎसी पाहील जेजुरी ।

ज्ञान कोटंबा घेऊन आलो दारी । बोध भंडारा लावीन परोपरी ।

एका जनार्दनी विनवी श्रीहरी । वारी देऊनी प्रसन्न मल्हारी ।

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel