मुका झालो वाचा गेली ॥ध्रु॥

होतो पंडीत महाज्ञानी । दशग्रंथ षड्‌शास्त्र पुराणी ।

चारी वेद मुखोद्‌गत वाणी । गर्वामध्ये झाली सर्व हानि ॥१॥

जिव्हा लाचविली भोजना । दुग्ध घृत शर्करा पक्वान्ना ।

निदिले उपान्ना । तेणे पातलो मुखबन्धना ॥२॥

साधू संतांची निन्दा केली । हरिभक्‍तांची स्तुति नाही केली ।

तेणे वाचा पंगू झाली । एका जनार्दनी कृपा लाधली ॥३॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel