वासुदेव स्मरणी तुटती जन्म व्याधी ।

अहं सोहं कोहं मूळ ह्या सांडी उपाधी ॥१॥

रामकृष्ण वासुदेव गोपाळ वाचे आठवा ।

जन्मजरा तुटे वाचे आठवीत साठवा ॥२॥

चिपळ्या टाळ घुळघुळा शब्द नादे ।

तेणे ब्रह्मानंद ह्रदयी आठवण नांदे ॥३।

एका जनार्दनी वासुदेव चिंतिता ।

यम काळदूत पळती नाम ऎकता ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel