सासर-वाशिणीला तीला बोलती सारासारी

कत कैवाळू हुता दारी ।

सासर येवढा वस नका करु सासूबाई

तुम्हा सारखी माझी आई ।

सासूनी सासईरा जाई मोगबीर्‍याच आळ

त्येचा त्या सावलीला परबीजाचं मी कंबाळ ।

सासू नी सासईरा दोन्ही काशीची देवईळं

चुड माझं ते राजईस वर निशाण पिवळं ।

जिवाला भारी जड माझा सांगावा जाता जाता

परसदरी माझी माता तांब्या ठेवीला तोंड धुता ।

मध आळीत माझा पिता चिलीम ठेवीली वढता वढता

देव खोलीत बंधू हुता सान सारीली गंध लेता ।

पडयाल सोप्या भावज उभी घागरी ठेवल्या पाण्या जाता

चुलता पंडीत बोलईतो लावा कंदील जाऊ आता ।

जिवाला भारी जड, मी का उंबर्‍या दिल उस

बया मालनी खाली बस जिमनी लोळती माझ केस ।

जिवाला माझ्या जड नव्हं कुणाच्या जावा भावा

बया माजीला आणा जावा मग हुईल माझी सेवा ।

राहती हसून खेळून जन म्हणती सुखाचा

पित्याच्या नावापाई ध्याई जाळती लाखाची ।

आपल्या घरा आली सून घराची मालकीन

सासू बोलईती सून नव्हं ती लेक भैन ।

सावित्री भावजयी तुझं बोलणं हकाराचं

सत्यवान बंधुजीचं गोड बोलणं शंकराचं ।

सावित्री भावजयी तू बोलली रागात

सत्यवान बंधुजी झेंडू सुकला बागात ।

सावित्री भावजयी भांगामधी तू घाल बोट

सत्यवान बंधुजीची माझ्या चंद्राची कोर नीट ।

डागाया मधी डाग डोरबील्याचा साज

माझ त्या कतायाचं शिरीमंताच हाई राज ।

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel