सासू सासरा बाई म्हने पडे उजेड वाडयावर

सासू मालन म्हनीयीती जान जमकाना माडीवर ।

जिवाला माज्या जड कोन माज्या कळकळीचं

बयाजी माज्या बाळं वाघ सुटलं साकळीचं ।

जिवाला माझ्या जड कसं कळालं हरनीला

बया माज्या मालनीचा पाय ठरना धरनीला ।

जिवाला माझ्या जड जावा बगूनी गेल्या शेता

पिता माझा दवलत आला सुक्कीर उगवता ।

जिवाला माज्या जड माजी दुकती नकंबोटं

बया माजी मालन माजी वैदीन गेली कुठं ।

जिवाला माझ्या जड माज्या जिवाचं धनी कोण

नटव्या माजा बंदु शान्या शाईरा मनी जाण ।

जिवाला माज्या जड कसं कळालं गांवांत

हावशा माज्या कांता कडू लागलं पानांत ।

जिवाला माझ्या जड गरड लिंबूला घाली मिठी

हौशा ते माजे कांत इष्ट मैतर झाले कष्टी ।

दुंडावा माजा हात हौशा कांताच्या नजरेत

हिरेजडीत बिलवर केली खरेदी मुंबईत ।

वाट मी किती पाहू गावा गेलेल्या रंगेलाची

पानं सुकली रतीबाची ।

वाट मी किती पाहू गावा गेलेल्या वकिलाची

चित्र कोमेली बंगल्याची ।

वाट मी किती पाहू गावा गेलेल्या सजनाची

येळ झालीया भोजनाची ।

गावाला गेले म्हनू एक महिना तीन वार

माजं बाळराज माज्या गळींचा चंद्रहार ।

पाची प्रकारच ताट वर केळीची केळफणी

माज्या ग बयावानी हांक मारीली मला कुनी ।

पाची प्रकारच ताट भाजी मेथीची इसरली

माज्या बंदुराया ऊठ सरदारा चुकी झाली ।

पाची प्रकाराच ताट खडीसाखर निवायाला

उठा बंदुजी जेवायाला ।

पाची प्रकाराच ताट दुधा तुपाचे गेले पाट

धाकटया बंदुराया किती बगू मी तुझी वाट ।

पाची प्रकाराच ताट दुधा तुपानं भरल्या वाटया

माजी बंदुजीसंग ग नीत जेवाया तलाटया ।

पाची प्रकारच ताट वर साकरची शाइ

माज्या बंदुजीला जेव म्हनाया आई न्हाई ।

पाची प्रकाराच ताट मी का वाडीते ऊन ऊन

माज्या त्या बाळराजा न्हाई पाठीची सक्की भैन ।

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to ओवी गीते : इतर


महाराष्ट्राचे शिल्पकार
देवी आरती संग्रह
कविता संग्रह
शिव-परिवार प्रतिमेचे रहस्य
ओवी गीते : स्त्रीजीवन
भारताची महान'राज'रत्ने
 भवानी तलवारीचे रहस्य
कविता संग्रह : संजय सावळे 4
संभाजी महाराज - चरित्र (Chava)
ओवी गीते : मुलगी
Indian Agriculture
ओवी गीते : भाविकता
ओवी गीते : बंधुराय
ओवी गीते : समाजदर्शन
ओवी गीते : सोहाळे