गाडीची ग बैल मागं फिरुनी बगत्याती

ताईता बंदु माज्या धन्या विसावा मागत्याती ।

गाडीच्या बैलाला ग रातीची पडली चाल

गाडिवानाचं डोळ लाल ।

जडाभाराचं पितांबर म्हेवना राजस वाचईना

माज्या त्या भइनीला धर राधाला पोचईना ।

लुगडं घेतयीलं त्यात रेशमी काय न्हाई

ताईता बंदु बोले भैना एवढयानं झाल न्हाई ।

भावज गुजयिरी पाया पडावं चांगयिलं

हळद्कुंकवानं माजं जोडवं रंगयिलं ।

सासू नि सासरा दोन्ही तुळशीची रोप

त्येच्या बी सावलीला गार लागती माजी झोप ।

आपल्या भ्रताराची सेवा करावी आदरानं

माजी तू भैनाबाई पाय पुसावं पदरानं ।

प्रीतीची एवडा कांत नको प्रीतीवर जाऊ

पानांतल्याबी नाव न्हाई लागत अनुभाऊ ।

उभ्या मी गल्ली जाते दंड भुजवा झाकुनी

पानी पित्याचं राकुनी ।

जिवाला भारी जड कुनी येऊनी काय केलं

बयाच्या बाळायांनी दूध वाघाचं पैदा केलं ।

बापांनी केल्या सुना लेका परास देकयीन्या

हाती दवत लेकयीन्या ।

माज्याबी अंगनात बाळ कुनाचं गजबार

सुशी सावळी बाळ माजी तिची मावशी हौसदार ।

जातीसाठी माती माती खतांना लागं बाळू

पित्या माज्या दवलता ढान्यावागा मी तुझी बाळू ।

पावना आला म्हनूं सासू मालनीचा भाऊ

करंज्या तळती माजी जावू नंद-कामिनी दिवा लावू ।

सांगावा सांगियीती सांगली गावच्या सराफाला

सोन्याची साकळी बघू माज्याच्या घडयाळाला ।

गुज ग बोलायाला दार माळीचं ढकलावं

माजी तू भैनाबाई मग हुरदं उकलावं ।

चांदीच्या खंदीलाला त्येला सोन्याची जोडवात

बंधु माज्याला रात झाली सातार्‍या तालुक्यात ।

जिवाला खावी वाटे सत्यनारायणाची पोळी

भैनाची माज्या बाळ माज्या पूजेला चाफेकळी ।

आठ दिसाच्या सोमवारी नको पापिनी गहू द्ळूं

साता नवसाचा माजा भाऊ ।

गावाशेजारी गावंदर शिवेशेजारी हाई मळा

पित्या माज्या गुजराची सदा कुणव्याची तारंबळा ।

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to ओवी गीते : इतर


महाराष्ट्राचे शिल्पकार
देवी आरती संग्रह
कविता संग्रह
शिव-परिवार प्रतिमेचे रहस्य
ओवी गीते : स्त्रीजीवन
भारताची महान'राज'रत्ने
 भवानी तलवारीचे रहस्य
कविता संग्रह : संजय सावळे 4
संभाजी महाराज - चरित्र (Chava)
ओवी गीते : मुलगी
Indian Agriculture
ओवी गीते : भाविकता
ओवी गीते : बंधुराय
ओवी गीते : समाजदर्शन
ओवी गीते : सोहाळे