सांगून धाडिते - नाही आला सांगल्यानं

कठूर केलं मन - भाऊ मह्या रंगिल्यानं ।

साळीचे तांदुळ - उभ्याउभ्यानं दंडाळी

बंधव पाव्हणे तांदुळ - संगे सव्वाशे मंडळी ।

साळीचे तांदुळ - म्या दुकानी पाहिले

बंधव पाव्हणे - संगे अरब रोहिले ।

बहीण भावाचा - कसा इचार चांगला

भाऊ पुसे बहयणीला - माडी बांधु का बंगला ।

भारी भारी खण - चाटी वळणी लाविले

भाऊला मह्या म्या - ते बोटाने दाविले ।

बारीक बांगडी - कासाराच्या बैलावरी

रंगीला भाऊ मव्हा - पारावरी मोल करी ।

अंगणात उभा - अंगण मव्हं देत शोभा

रंगीला दादा मव्हा - खण मइया चोळीजोगा ।

शिण्याला साताला - दादा बसले पंडित

दादाच्या मांडीवरी - साडी हिरवी रंगीत ।

मला मोठी हाऊस - देऊळगावचं लुगडं

भाऊ घोडयावरी - चाटया फडताळ उघड ।

चौघं जण भाऊ - मला चार चोळ्या घेती

गिर्जाबय्या माही - सौती साडी बलावती ।

बारा हे ग बैल - तेराव्वी आहे सिंगी

भाउला ग मह्या - दयव आलं इच्यापायी ।

गायीचं गोमीतर - देवामंधी पवितर

मह्या रंगील्या दादाचं - त्यात भिजलं धोतर ।

गायीचं गोमितर - अंगणी वाहे गंगा

पाठीच्या भाऊ महया - दयव तेथ पांडुरंगा ।

बैल सईल्याच्या - चारी पायात केसरी

भाऊला उभारी - जोडी घेयाची दुसरी ।

मोठ हाने मोठकरी - बारे देतो बारेकरी

सेताला घाले फेरी - दादा माहे कारभारी ।

वानी या तिनीचे - भाऊ मन्हे सुखी राव्हं

असा शोभा देत - झाडामंधी मव्हा गाव ।

सांगून धाडिते - मह्या मावस भावाला

चांदीचे कळस - टांगा झळकतो शिवंला ।

वाटंनं चालला - भाऊ मव्हा गोरापान

सोन्याची छतरी - वर्‍ही सूर्व्यनारायण ।

पुतळ्याची माळ - मह्या ये ग बह्यणी लेती

वडील बाई माही - शोभा बह्यणीला देती ।

आम्ही तिघी बह्यणी - तीन गावच्या खारका

मायबाई माही - मंधी नांदते द्वारका ।

आम्ही तिघी बह्यणी - तीन गावचे जागेमंधे

भाई राजस ग माझे - मध्ये लावणीचे अंबे ।

आम्ही तिघी बह्यणी - एकूण एकीच्या पाठच्या

भाई राजसानं मह्या - चोळ्या शिवल्या जरीच्या ।

शिण्याच्या साताला - सौतं खणाळ फाडलं

ज्याला न्हाई भैन - त्याल नवल वाटलं ।

मला मोठी हाऊस - दऊळगावच्या बांडाची

वडील मेव्हण्यानं - केली खरेदी दिंडाची ।

बापाजीचा वाडा - बाइ ही रेंघते धावत

सीता भावजई - आली बिजली लवत ।

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to ओवी गीते : इतर


महाराष्ट्राचे शिल्पकार
देवी आरती संग्रह
कविता संग्रह
शिव-परिवार प्रतिमेचे रहस्य
ओवी गीते : स्त्रीजीवन
भारताची महान'राज'रत्ने
 भवानी तलवारीचे रहस्य
कविता संग्रह : संजय सावळे 4
संभाजी महाराज - चरित्र (Chava)
ओवी गीते : मुलगी
Indian Agriculture
ओवी गीते : भाविकता
ओवी गीते : बंधुराय
ओवी गीते : समाजदर्शन
ओवी गीते : सोहाळे