आम्ही दोघी जावा आमुचं एक मत

नका घालू आडभिंत भाऊजीराया ।

सासर्‍याला जाती लेक लाडकी बापाची

तिजला घालवया सभा उठली लोकांची ।

सासर्‍याला जाती लेक भीमाशंकराची

तिला घालवाया येती हात भरुनी बिल्वराची ।

सासरी जाताना भर ग नवा चुडा

मायबाईनं तुला दिला कुंकवाचा पुडा ।

सासर्‍याला जाती बहीण भावाची लेकुरवाळी

बंधवाच्या हाती दुधाची ग शिंकाळी ।

सासर्‍याला जाता ऊन लागतं माझ्या बापा

दोन्ही अंगांनी लावू चाफा ।

सासर्‍याला जाता ऊन लागलं माझ्या आई

दोन्ही अंगांनी लावू जाई ।

माहेराची होते सारखी आठवण

आता मायबाई कधी धाडिशी बोलावणं ।

माहेराची वाट किती पहाते मी भारी

मायबाई माझी राहिली फार दुरी ।

माहेराची आठवण करीते मी नीट

मायबाई कधी होईल तुझी भेट ।

माहेरी जाताना लाजली चंद्रभागा

आता रखमाबाई भेट कधी होईल सांगा ।

माहेरी जाताना लागलं पंढरपूर

पाठी उभा राहिला शारंगधर ।

पड रे पावसा पिकू दे दाणापाणी

मग भावांना बहिणी आठवती ।

दळणं दळावं जसं हरणं पळतं

मायबाईचं दूध माझ्या मनगटी खेळतं ।

भाऊबीजे दिवशी भाऊ घालतो ओवाळणी

त्यानं ताटामधी टाकीला तन्मणी ।

भाऊबीजे दिवशी भावानं काय दिलं

आता मायबाई चंद्रहाराला मापलं ।

नणंद भावजयी आपण मारगी उभ्या राहू

हळदी कुंकावाच्या गोण्या खंडूनी नव्या घेऊ ।

नणंद भावजयी आपण सोनारवाडया जाऊ

कुंकवाच्या करंडयाला मोत्यांच्या जाळ्या लावू ।

नणंद ग भावजयी आपण अंगणी उभ्या राहू

एकेमेकींची शीण पाहू विहीणी दोघी होऊ ।

आईच्या माघारी लेक माहेरी जाते वेडी

पुरुषांना माया थोडी ।

सुखदुःखाचा कुठं गेला माझा पिता

बोलेनाशी झाला बंधू वसरी उभा होता ।

सुखदुःखाची कुठं गेली माझी बयाबाई

बोलेनाशी झाली गर्वदार भावजयी ।

भाऊ शिवी चोळी वहिनी डोळे मोडी

आता मायबाई तिच्या चोळीची काय गोडी ।

भाऊ शिवी चोळी भावजय दीना दोरा

आता वहिनीबाई तुझ्या चोळीचा नको तोरा ।

चिकनी सुपारी तुझ्या कंथाला आवडे

दिवा घेऊनी निवडे वहिनी बाई ।

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to ओवी गीते : इतर


महाराष्ट्राचे शिल्पकार
देवी आरती संग्रह
कविता संग्रह
शिव-परिवार प्रतिमेचे रहस्य
ओवी गीते : स्त्रीजीवन
भारताची महान'राज'रत्ने
 भवानी तलवारीचे रहस्य
कविता संग्रह : संजय सावळे 4
संभाजी महाराज - चरित्र (Chava)
ओवी गीते : मुलगी
Indian Agriculture
ओवी गीते : भाविकता
ओवी गीते : बंधुराय
ओवी गीते : समाजदर्शन
ओवी गीते : सोहाळे