सुपात मोती दानं घालते मूठ मूठ

सजना दळायानं म्हणीना कूणी ऊठ ।

म्हणीना कोणी ऊठ आईशिवाय माया न्हाई

जिवाला तिच्या जड रडते ती धाई धाई ।

काटा बोचतां पायामंदी आईची व्हते सई

आई म्हणू आई, माझ्या तोंडाला येतं लई ।

आईच्या सईनं ग मोती पिकती पापण्यात

गालावर वघळती मोत्यांच्या दळणात ।

जिवाला माझ्या जड माझ्या जिवाचं धनी कोण

सावळ्या बंधुराजा शान्या शाहिरा मनी जाण ।

बंधूजी बोलईतो भैना दिलेल्या घरी र्‍हावं

लाडके राजूबाई भांड न्हवं ते बदलावं ।

जिवाला जड भारी कोणाला घालू वज

पिता दौलतीच ढाण्या वाघाचं हाई बीज ।

दळण दळीते मी गीत गाऊ कुणा कुणा

जन्म दिलेल्या दोघा जना ।

माझा ग पिंड बाप्पाजींच्या दंड भुजा

माझे तू बया बाई, तुझीच मी रुपवजा ।

बाप्पाजी बयाबाई दोन्ही आमृताची कुंडं

त्यात जलमला माजा पिंड ।

पिताजी दौलतीनं कीर्त केलीया थोडी भाऊ

वाटेवर त्येची हिर पाणी पितया सारा गावू ।

सासू नि सासईरा माझा देव्हारा कुलूपांचा

चुडया माझ्या त्या राजसाचा हात पूरना मानकाचा ।

पाण्यातली नाव तिचा कळना आणभाव

पिरतीचा कंत, कंत बोलवी आवं जावं

मन मोहन पाणी द्यावं ।

जावा नि जावा आमी, एका ग चालीच्या

जन ते इचारती सूना कुण्या त्या नारीच्या ।

वळवाचा पाऊस वडय नाल्याला नाही धर

हावशा कंतराज कंत मनाचं समींदर ।

पूजा मी ग करीयीती बेल वहाती शंकराला

आयुष्य मागती भ्रताराला ।

नवस मी ग केलं कोल्हापूरच्या अंबाबाई

आई सारख्या सासूबाई त्यांचा आधार मला लई ।

स्वर्गीच्या रे देवा तूजी माजी आन भाक

माजं जलम कुंकू राक ।

जोडव्या झनकारु नित इरुद्या तीन ठसं

माझे ग सूनबाई काम हुईना खाली बस ।

जोडव्या जनकार नित इरुद्या तीन रव

माझी सून बाई घरादारात ईज लवं ।

सकाळी उठोयानी जात्यावरला केर लोटी

बापाची बयाबाई रत्‍न तोंडाला येण्यासाठी ।

पहिली माझी ओवी गाते बापाजी गुजराला

बया माझी ती गौळण बया तुळस शेजाराला ।

द्रौपदीबाईसाठी द्याव झाल्याती रंगारी

त्यांनी रंगविली आपली वस्त्रं नानापरी ।

जग जातया यात्रेला आपण जावूया माहेराला

बापाजी बयाबाई दोन्ही क्षेत्र पाहायला ।

बापाजी बयाबाई दोन्ही काशीची देवळं

माझा तो बंधुराया मध्ये निशान पिवळं ।

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to ओवी गीते : इतर


महाराष्ट्राचे शिल्पकार
देवी आरती संग्रह
कविता संग्रह
शिव-परिवार प्रतिमेचे रहस्य
ओवी गीते : स्त्रीजीवन
भारताची महान'राज'रत्ने
 भवानी तलवारीचे रहस्य
कविता संग्रह : संजय सावळे 4
संभाजी महाराज - चरित्र (Chava)
ओवी गीते : मुलगी
Indian Agriculture
ओवी गीते : भाविकता
ओवी गीते : बंधुराय
ओवी गीते : समाजदर्शन
ओवी गीते : सोहाळे