पाटानं जातं पानी सपाट बाई व्हातं

पानी अंजीबीराला जातं ।

माळ्यानं केला मळा माज्या बंदुनी कला बाग

शिनच्या गडयींनी मला अंजीर तोडू लागं ।

देवामंदी देव देव कुंडलिक किती धट

त्येंनी धारला दिला मठ ।

देवा महादेवाला रात झाली नात्यापुत्याच्या बाजारात

गंगा गिरजा वाट पहाती उभी कमानी दरवाज्यात ।

नदीच्या पलीकडं कोन पतंग अंग धुतो

वानीचा माजा बंदु चंद्रासारीका ढाळ देतो ।

शेजीच्या बंदुसंगं उबा र्‍हाऊनी अंगनात

आपल्या बंदुसंगं वस्ती करावी जंगलात ।

शिंदी शाई तोडं त्येंची घडन सातार्‍याची

माजी ती भैनाबाई सून लाडकी सासर्‍याची ।

जावाई मनुष्याच्या त्येच्या चौकबीटीला सोनं

माज्या बाळ्या पायगून ।

दिवाळी दसरा एका म्हईबीन्यात दोन

वानीच्या माज्या बंदु तुमा घरी मी पावयीन ।

शेजी इच्यारीती, माजं अंगान वलं झालं

वानीच माज बंदु भाऊबीजेला राती आल ।

लोकाच्या आयारानं झाला मांडव लाली लाल

माज्या बंदुच्या आयाराची आली परात हिरवीगार ।

लोकाच्या आयारानं माज्या मांडवी झाली दाटी

माज्या बंदुच्या आयाराची आली परात जरीकांठी ।

लोकाच्या आयाराची घडी ठेवली खुंटीवर

माज्या बंदुच्या आयाराचा जरी पदर पाठीवर ।

लोकाच्या आयाराची उगीचच ऊरफोड

माज्या बंदुच्या आयाराची जाव मालनी घडी मोड ।

ऊंच ऊंच चोळ्या घरा मागली शेजी लेती

मावली बाई माजी तिच्या परास चड घेती ।

तांबडया लुगडयाची निरी रुतती माज्या पोटां

चुडया माज्याच्या जिवावर मला शालूला काय तोटा ।

परटीन धुनं धुती लिंब देते मी ताजी ताजी

चुडया माज्या या राजसाची दोनी धोतरं अमदाबाजी ।

परटीन धुनं धुती लिंब देते मी रसायाची

माज्या बंदुजीची दोनी धोतरं वासायाची ।

समोरल्या सोप्यां तान्या बाळाचं हातरुन

लिंबू टाकीते उतरुन ।

पाळक पाळना वर खेळना परकराचा

माज्या बाळायाचा मामा मैतर जिनकराचा ।

मोटं नि मोटं डोळं, डोळ ठेवीतो ठेवनीला

माजी ती तानीबाळं रोपं सुरुची लावनीला ।

बुट्‌टीचं दळयीनं बाई त्ये दुरडीमंदी आलं

बया माज्या ग मालनीचं दिवस नाचाबीराचं गेलं

बाळ जोडीला तिच्या आलं ।

संपता आली म्हनूं लाडू बुंदीचं लागं कडू

गेली संपता निगूयींनी करडं अंबाडया लागे वाडू ।

सुबाना संतूबाई तुजी खंगाबीळली न्हानी

वानीचं माज बंदू हिर सापबीडलं दोनी ।

समरत सोयीयीरा करबीनीला भेला

आयारावरती शेला चड बंदूनी माज्या केला ।

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to ओवी गीते : इतर


महाराष्ट्राचे शिल्पकार
देवी आरती संग्रह
कविता संग्रह
शिव-परिवार प्रतिमेचे रहस्य
ओवी गीते : स्त्रीजीवन
भारताची महान'राज'रत्ने
 भवानी तलवारीचे रहस्य
कविता संग्रह : संजय सावळे 4
संभाजी महाराज - चरित्र (Chava)
ओवी गीते : मुलगी
Indian Agriculture
ओवी गीते : भाविकता
ओवी गीते : बंधुराय
ओवी गीते : समाजदर्शन
ओवी गीते : सोहाळे