आले ग तेलफळ हिरवी साडी शकुनाची

वरती जोडी बांगडयांची ठेवीयली ।

नेसली हिरवी साडी गौरीहारापाशीं चला

मायलेकी ओटी भरा पाच जणी ।

वाजंत्री वाजती चला घाणा भरायाला

मग देवकाला बोलाविती ।

आधी मूळ धाडा घुंगराची गाडी

घाल जोडीचे वर्‍हाडी गणराज ।

आधी मूळ धाडा चिपळून गावा

परशराम देवा आमंत्रण ।

देवदेवकाला बसली मातापीता

आहेर करा आतां म्हणताती ।

पुण्याहवाचन देवतांची केली पूजा

आधीं गणराजा वंदीयेले ।

नेले रुखवत वाजत गाजत

आली मुरडत करवली ।

आणिले रुखवत अगणित ते प्रकार

लाडू, जिलब्या घीवर मांडीयेले ।

वाढीले रुखवत रांगोळ्यांचा थाट

जांवयाचा पाट चंदनाचा ।

जांवई बैसले सासुबाई चला तुम्ही

तुपाची आपोषणी घालावया ।

काजळाचे बोट लाविती गालाला

दृष्ट नको पडायाला नवरदेवा ।

हजाराचा घोडा त्याला पन्नसाची झूल

वर बसणारा फूल दादाराया ।

नवरदेव आला दहीभात ग ओवाळा

पायावरी पाणी घाला दादारायाच्या ।

औक्षण केलें कुंकू लावूनी कपाळा

नारळ हातीं दिला हलव्याचा ।

हात धरुनियां आणिलें मांडवांत

चांगला मुहूर्त पाहूनिया ।

आधीं जेष्ट मान मोठया जांवयाला

मग कनिष्ठाला मधूपर्क ।

लग्नाच्या वेळेला नवरी कापे थरथरा

मामा येईतो धीर धरा दादाराया ।

दूर झाला अंतरपाट लागले लगीन

नेत्रांचे मीलन क्षणभर होई ।

आणिली लग्नसाडी ठेविली झांकून

बांधीती कंकण एकमेकां ।

झाले कन्यादान लेक झाली ग परकी

डोळ्याला गळती सखी लागतसे ।

लज्ज्या होमाच्या ग वेळी भाऊ कोठे गेला म्हणती

मानाची टोपी देती नानारायाला ।

सप्तपदीच्या ग वेळी अंगठा दाबते करवली

मानाची देवू केली साडीचोळी ।

सर्व सोहाळे जाहले राहिली वरात

चला विहीणी घरांत जेवावया ।

जेवणाचे आमंत्रण मोठयाच्या अक्षता

रांगोळी उदबत्या थाट केला ।

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to ओवी गीते : इतर


महाराष्ट्राचे शिल्पकार
देवी आरती संग्रह
कविता संग्रह
शिव-परिवार प्रतिमेचे रहस्य
ओवी गीते : स्त्रीजीवन
भारताची महान'राज'रत्ने
 भवानी तलवारीचे रहस्य
कविता संग्रह : संजय सावळे 4
संभाजी महाराज - चरित्र (Chava)
ओवी गीते : मुलगी
Indian Agriculture
ओवी गीते : भाविकता
ओवी गीते : बंधुराय
ओवी गीते : समाजदर्शन
ओवी गीते : सोहाळे