अर्जुन उवाच

योग युक्‍त सतत असे भजती तुजला तसेच जे भजती ॥

अव्यक्‍त अक्षर ऐसें ब्रह्म यांत योग्य कोणते असती ॥१॥

योग युक्‍त सतत मना मज ठायीं ठेउनच मज भजती ॥

श्रद्धा युक्‍त असे जे श्रेष्ठ तेच जाण मम मते असती ॥२॥

अव्यक्‍त अचल अचिंत्य दृढ अविनाशी अवर्णनीयाला ॥

भजती सर्वव्यापी स्थीर अढळ जे अशाच रुपाला ॥३॥

इंद्रिय निग्रह करिती प्राणी हित चिंतनांत मन गुंते ॥

समबुद्धीही भूती ते येती मजकडेच की अंते ॥४॥

ज्याचे मन अव्यक्‍ती सक्‍त असे त्याग कष्ट बहु होती ॥

देही जो त्यास मिळे कष्टानेच तशी अव्यक्‍त गती ॥५॥

होऊन मत्परायण कर्मे मजलाच सर्व अर्पीती ॥

अनन्य योगें ध्याती उपासना मम तशीच जे करिती ॥६॥

आसक्‍ती मम ठायी पार्था त्यांना उशीर न करितां ॥

मृत्यू जयात ऐशा संसारी होय मीच उद्धरितां ॥७॥

ठेवी मन मम ठायी माझे ठायींच बुद्धिही स्थीर ॥

म्हणजे पुढे न संशय माझे ठायींच वास करणार ॥८॥

स्थैर्य मना आणाया धनंजया तुं समर्थ नसशील ॥

इच्था धरी अशी की अभ्यासे मजसि तू मिळवशील ॥९॥

अभ्यास अशक्य तरी अर्पीतव सर्व कर्म ही मजला ॥

ऐशा कृत्यानेही अंती तू पावशील सिद्धीला ॥१०॥

अशक्य हे ही तुज तर अवलंबी कर्मयोग माझा हा ॥

करुन मन संयमना लोभ सोड कर्म फल मिळावें हा ॥११॥

ज्ञान थोर अभ्यासापेक्षा त्याहून थोर तें ध्यान ॥

कम फल त्याग तयापेक्षा ये शांति तया मागून ॥१२॥

प्राण्याशी द्वेष नसे मैत्री भूतीं न ज्या पर अपुलें ॥

विरागी निरहंकारी दुःख सुखहि सारखे मनी गणिलें ॥१३॥

मनी तुष्ट संयमी निश्‍चय दृढ बुद्धि मनहि मज ठायीं ॥

क्षमा शील भक्‍त असे जन मजला तोच बहु प्रिय होयीं ॥१४॥

त्रास नसे जो लोका लोक जया त्रास मुळी न च होती ॥

क्रोध हर्ष भय तैसा उद्वेग मुक्‍त प्रिय मजशि अती ॥१५॥

नसे अपेक्षा काहीं दक्ष शुद्ध उदासीन निश्‍चिंत ॥

संकल्पाला त्यागी प्रिय मजला होय तोच मम भक्‍त ॥१६॥

हर्ष द्वेष नसोनी गतशोक नसे न इच्छि कांही ॥

शुभाशुभहि कर्म फले त्यागी प्रिय भक्‍ति मान मज तोही ॥१७॥

शत्रू मित्र समज या अपमान मान समान जो मानी ॥

आसक्‍ति न कोठेही सुखदुःखे शीत ऊष्ण सम मानी ॥१८॥

स्तुति निंदा सम मानी मौन धरी शांतही मिळे त्यात ॥

स्वस्थान जसें मज तो स्थिर चित्त भक्‍त मुनी प्रिय होत ॥१९॥

मत्परायणच असुनी ज्ञान अमृत-मय पवित्र सेवीती ॥

श्रद्धा युक्‍तहि असती प्रिय अतीच मजसि भक्‍त ते होती ॥२०॥

सारांश

शा.वि.

पूजा जे करिती तुझीच अथवा ब्रह्मास जे पूजिती ॥

कृष्णा श्रेष्ठ तयात अर्जुन पुसे जी रीत ती कोणती ॥

पूजावे मजलाच हेच बरवे माझे मते पांडव ॥

भक्‍ती ब्रह्मपदी अती कठिण हे सांगे तया यादव ॥१॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to समश्लोकी भगवद्‌गीता


देवांच्या भूपाळ्या
आस्तिक
श्री शिवलीलामृत
श्री शिवलीलामृत
स्तोत्रे १
चिमणरावांचे चर्हाट
मनुस्मृति
गणेश स्थापना पूजा विधी
प्रेरणादायी गोष्टी 6
खलील जिब्रानच्या निवडक कथा
बोरकरांच्या कविता Borkar Kavita
श्रीगणुदासकृत - श्रीकृष्ण - कथामृत
अधिकमास माहात्म्य पोथी
साईबाबांची उपासना
श्री साई बाबा भजन, अभंग