श्री गणेशाय नमः
शिख०
मुकुंदा श्रीकृष्णा यदुकुलवतंसा मुर अरी ॥
यशोदा चित्ताचें सतत करिशीं तूं शम हरी ॥
समस्ता देवांना स्थल नच तुझे ज्ञान असता ॥
सुभक्ता तूं नेशीं स्वपदकमलीं नम्र बनता ॥१॥
आर्या
बुद्धी काही नसता ज्ञानहि नसता तुला स्तवायाते ॥
इच्छा मोठी वाटे भगवग्दींता-मृता स्तवायातें ॥१॥
यास्तव अनन्य भावे नमितो त्या शक्तिसागरा कृष्णा ॥
देउनि बुद्धी कवनी तृप्त करी बा जडाचि ही तृष्णा ॥२॥
स्त्रग्धरा
गीता जी अर्जुनाते कथन हरि करीं शुद्ध तत्वा कळाया ॥
व्यासानी भारती ती मधुर रचियली देववाणी जगी या ॥
अद्वैताच्या सुधेला कथन करित ती आठराध्याय योगे ॥
वंदी मी तीस आधी भवदवशमनी जी सदा मार्ग सांगे ॥३॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.