आम्ही सुस्थितीत असलो म्हणजे आमचे नामस्मरण अधिक होते. त्यात काही बिघाड झाला की तिकडेच सारे लक्ष वेधते. याला कारण म्हणजे आमचे स्मरण हे वरवरचे असते. श्रध्देने नामस्मरण करणे आपल्याला कठीण जाते. परमात्म्याशिवाय आपले कोणी नाही असा दृढ निश्चय असणे आवश्यक आहे. म्हणजे मग प्रकृतीत काही बिघाड झाला तरी आपले स्मरण टिकून राहील. द्रौपदीला आता आपला कोणी त्राता नाही असे वाटून जेव्हा तिने श्रीकृष्णाचा धावा केला, तेव्हा भगवान लगेच धावून आले. असेखर्‍या कळकळीचे स्मरण आपले असायला पाहिजे. जसे लहान मूल काहीही झाले तरी आपल्या आईलाच हाक मारते, दुसरे तिसरे कोणी जाणत नाही, तसे आपले परमेश्वर-स्मरणाच्या बाबतीत झाले पाहिजे. आपली भिस्त खरोखर कोणावर आहे हे संकट्काळीच उत्तम कळते.

नामस्मरणाच्या पायर्‍या अशा सांगता येतील- पहिली, सुस्थितीतले वरवरचे नामस्मरण; दुसरी, परमात्म्याशिवाय आपले कोणी नाही ही जाणीव होऊन, संकटसमयी त्याचे स्मरण; आणि तिसरी, हीच जाणीव पुढे दृढ होऊन अखंड होणारे नामस्मरण. यांपैकी वरवर स्मरण करणारा ’ आम्हाला संकतेच नकोत ’ असे म्हणतो, तर साधुसंत ’ आम्हाला संकते येऊ देत ’ असे भगवंताजवळ मागतात, कारण त्यावेळेसच त्याचे खरे स्मरण होते. आपण स्वतः आहोत याची आपल्याला आज जितकी खात्री आहे, तितकी खात्री भगवंत आहे अशी झाली पाहिजे. परमात्मा सर्व ठिकाणी आहे ही कल्पना केव्हा तरी आपल्याला होते खरी, पण ती कायम न राहिल्याने दृढपणे आचरणात येत नाही; आपली वृत्ती तशी झाली की ती आपल्या आचरणात येईल. भगवंत हा कर्ता आहे आशी भावना दृढ झाली की आपण प्रत्येक गोष्ट त्याला सांगत बसणार नाही. ’ भगवंताला माझे सर्व कळते ’ असे जर खरे वाट्ले तर त्याला आवडेल आसेच वागू. पहाटे उठावे आणि भगवंताची मूर्ती डोळयांसमोर आणून प्रर्थना करावी, आणि " तुझे विस्मरण जिथे होते, तिथे मला जागृत करीत जावे; नाही मला आता तुझाशिवाय आसरा, " असे म्हणून त्याला मनपूर्वक नमस्कर करावा. मनुष्य कसाही असला तरी भगवंताच्या स्मरणात त्याला समाधान खात्रीने मिळेल. जो भगवंताचा झाला त्याला जगण्याचा कंटाळा कधीच येणार नाही. विषयाचा आनंद हा दारूसारखा आहे; ती धुंदी उतरल्यावर मनुष्य जास्त दुःखी बनतो. ’ मी भगवंताचा आहे ’ या भावनेने जो राहील त्यालाच खरा आनंद भोगता येईल.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel