प्रपंचात जसा पैसा लागतो त्याप्रमाणे परमार्थात भाव लागतो . प्रपंचात पैशाशिवाय चालूच शकत नाही . परमार्थही भाव असल्याशिवाय होत नाही . जसा तुमचा भाव असेल त्याप्रमाणे तुम्हाला देवाची प्राप्ती होईल . प्रह्लादाला खांबातही देवाची प्राप्ती झाली , तर नामदेवाने दगडाच्या मूर्तीलाही जेवू घातले . तुम्हा सर्वांना गोपीची गोष्ट माहीत असेलच . त्या गोपीला श्रीकृष्णाला जेवण घालायचे होते , पण तिचा नवरा तिला जाऊ देईना . त्यावर तिने सांगितले की , हा देह तुझा आहे , परंतु मनावर तुझा ताबा नाही . असे म्हणून ती त्याच्याजवळ देह ठेवून श्रीकृष्णाकडे गेलीच की नाही ? त्याप्रमाणे आपण परमार्थात भाव ठेवणे जरुर आहे . पण असे आपण नुसते म्हणून काय उपयोग ? तो सर्वव्यापी आहे , सर्वसाक्षी आहे , असे आपण म्हणतो , पण आपण पापाचरण करायला भितो का ? तो आपल्याला पाहातो आहे असे पक्के वाटले तर आपल्याकडून कधीतरी पाप होईल का ? पण आपल्याला तसे वाटतच नाही . आपल्यासारख्या आस्तिकाला देव ‘ हवा ’ असे वाटते खरे , पण ‘ हवाच ’ असे वाटत नाही . आपल्या प्रपंचाच्या मदतीसाठी देव हवा असे वाटते . प्रपंच ‘ असावाच ’ असे आपल्याला वाटते , आणि भगवंत मात्र ‘ असला तर बरा ’ असे वाटते . याच्या उलट , ‘ भगवंत असावाच ’ आणि ‘ प्रपंच असला तर बरा ’ असे वाटायला पाहिजे . प्रपंचाची आवड असू नये , पण प्रपंचातल्या कर्तव्याची आवड असावी . देहाने ते कर्तव्य करावे , आणि मनाने मात्र अनुसंधान ठेवावे . ज्या गोष्टी आपल्या मनाला खातात त्या न केल्या की आपला आपल्या विकारांवर ताबा येईल . भगवंताच्या देखत आपल्याला करायला लाज वाटणार नाही , अशीच कृती आपण करावी .

ज्यांना व्याप आहे ते लोक रडतात , आणि ज्यांना व्याप नाही तेही लोक रडतात ; मग सुख कशात आहे ? पैसा सुख देतो का ? पैसा मिळविणे कठीण , मिळाला तरी तो कायम राहील का त्याची शाश्वती नाही . पैशाप्रमाणेच इतर सर्व वस्तूंची गोष्ट आहे . सर्वसुखी असा प्रपंचात कोण आहे ? प्रत्येकाचे काही ना काही तरी गार्‍हाणे आहेच . प्रत्येकाला आशा वाटते की मी उद्या आजच्यापेक्षा सुखी होईन . तो कधी पूर्ण सुखी होत नाही , त्याचे गार्‍हाणे कधी संपत नाही ! प्रपंचातल्या सर्व वस्तू नाशवंत आणि दु : खरुप अशा आहेत . म्हणूनच प्रपंच असत्य आहे , हा अनुभव प्रपंच देतो . त्या अनुभवाने प्रपंचात जो आसक्त होत नाही तो सुखी ; अनुभव विसरुन जो आसक्त होतो तो दु : खी . सुख हे समजुतीमध्ये आहे , आणि भगवंताचे होणे हीच समजूत तेवढी खरी आहे .

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to ब्रह्मचैतन्य महाराज - जून मास


ब्रह्मचैतन्य महाराज - ऑक्टोबर मास
ब्रह्मचैतन्य महाराज - जानेवारी मास
दासबोध
ब्रह्मचैतन्य महाराज - डिसेंबर मास
ब्रह्मचैतन्य महाराज - नोव्हेंबर मास
ब्रह्मचैतन्य महाराज - सप्टेंबर मास
ब्रह्मचैतन्य महाराज - ऑगस्ट मास
ब्रह्मचैतन्य महाराज - जुलै मास
ब्रह्मचैतन्य महाराज - मे मास
ब्रह्मचैतन्य महाराज - एप्रिल मास
ब्रह्मचैतन्य महाराज - मार्च मास
ब्रह्मचैतन्य महाराज - फेब्रुवारी मास
आत्माराम
हरिपाठ
ज्ञानेश्वरी Dnyaneshwari