सरल्यावर ही गरज सहज, वैद्याचें कारण नसे ।
तसे मशी जिवलगा जाहला पाठमोरे कसे ? ॥धृ०॥
ब्रह्मह्रदय जाणुन जवळ पायासन्निध पातले ।
दिसतें मन माघारें, आतां कां आळसावर घातलें ? ।
कामक्रोध षडरिपु दुष्ट शरिरामधें मातले ।
अपेक्षित इच्छिते हेत पुरवावे चित्तांतले ।
सुस्थळ जागा पवित्र पाहुन मी नि:संग राहातले ।
सुख द्यावें दुसर्यास, हित पहा मुळ शोधून आंतलें ।
वाटीभर दुध पिऊन शेवटीं पात्र रिकामें जसें ॥१॥
रात्रीचा दिवस करून बदलखातर ही गोष्ट साहिली ।
तेव्हांची ती गेली जशी मृगजळगंगा वाहिली ।
लइ लालुच दावुन, हळुच मज फुसू लावुन मोहिली ।
धरून हतिं नागीण, प्रीतिची बरि वेसण गोविली ।
एक म्हणतां दहा उभ्या, कोणती तरी त्यातुन चांगली ? ।
पुढली जाहलीं पुढें, मागली मग मागेंच राहिली ।
तृप्त होतां वासना, भोजनाचा कंटाळा असे ॥२॥
जाहली वाचादत्त कृपा मजवर जय संपादिले ।
तुम्ही आणिक मी पूर्वीं परस्पर वचन हतावर दिलें ।
तुळशीदळ जर शिळें जाहलें तरि शास्त्रीं वंदिलें ।
विसर पडूं नये कधिं, आधीं ज्याला पदरीं बांधिलें ।
घट उदंड, पण जीवन येक हें सर्वांतरीं भेदिले ।
अतिचंचल चैतन्य चित्त मायाचक्रीं बेधिलें ।
विटाळून सिद्धान्न, ताट भरलें वाया जातसे ॥३॥
तुम्हि चंद्रोदयप्रभा सख्या, मी आज्ञांकित आगळी ।
लाट सागरावरिल, तिला तरि कशि म्हणतां वेगळी ? ।
चालविले बरोबरी धरून माझी तुम्ही करांगुळी ।
हुरमोजी बिनडाग, डाग नसतां केली डागळी ।
एकांती खाशाचे बिछोन्यावरतीं पडते गळीं ।
कल्पवृक्ष भेटतां दैन्य जावें प्रपंचमंगळीं ।
होनाजी बाळा म्हणे, न धरि संशय किंचित राजसे ।
येक निश्चियावरून स्वामींचे सदय ह्रदय होतसे ।

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.