मंगळधामा श्रीरामा, कधीं मजला भेटसी ? ॥धृ०॥
कैकेयीच्या सत्य कराया पितृवचनातें मानी । चामरें, छत्रें दिधलीं भरता भक्त अभिमानी । अयोध्या सोडुनी जाले वैराग्य चापपाणी । मुगुट कुंडलें काढुनी वल्कलें वृक्षाचीं थाटसी ॥१॥

पतिश्रापें सीळा अहिल्या वनीं हो ती उद्धरली । या अरण्यवासामाजीं जयें शुर्पणखा वधिली । सुग्रीवास वाळी मर्दुनी त्वां कीस्कींदा दीधली । स्वामी मारुतीच्या राया मम ह्रदईं दाटसी ॥२॥

पाषाण तरले नामें सिंधुंतुन उतराया । बिभीषणासीं लंका दिधली हा रावण मुर्दुनीया । तेतीस कोटी सोडविलें बंदींतुन देव जया । हा आनंद सर्वत्रांचा. वाटसी ॥३॥

शत्रुचा क्षयो कराया अवतार धरिलासी । ऋषी ब्राह्मण जग रक्षाया जन्मला सूर्यवंशी । महाराज चापपाणी जय अयोध्यावासी । कवि आपा येशवंताचे लावणी दुर्गुण हे लोटसी ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel