नाजुक रुपडा बुंद मुखीं भर मदनाची लाली । नैनांतुन मारी लटक झटक मोहनी जीवा घाली ॥धृ०॥
मागें खोपा, कुरळ केश डोइला गे भांगाचा । चालतसे चहुकडे सुगंधी सुवास अंगाचा । भवां कमानामधीं लपविला चंद्र तारकेचा । झुमकेदार नथ नाकीं, चोळीचा रंग अंजरीचा । चीचपाटी झगझगीत, हार केठा भर मोत्यांचा । बहु नाजुक सकुमार, होई जीव पाहा तल्लीन त्याचा । भली गे निपजलीस कोठुन, नटुन मारिलें इष्काखालीं ॥१॥
सुरतपाक चमकसी तरुणीपण जोम नसे टळला । तनु शुद्ध कांचनी निमोण फरमासी ढळला । झुणेवर पातळ पैठणी झोक पुढें जमला । ठमक ठुमक चालणें रंभें पैंजणीं नाद घुमला । बघुन जालों दंग गौस गौसेना यत्न खुटला । बसुन अस्कीचा तीर अंतरींचा पडदा फुटला । तुजसाठीं मी लढुन भिडुन देईन प्राण हाली ॥२॥
अंबारीचे कळस तसे छातीवर गेंद पाहतां । असे नवतीचे कोंब नाहीं पाहिले उभे राहातां । दों दिवसांचा रंग सखे मागुता नये घडतां । कोण पुसेना तुला जरा जोबन ढिले पडतां । भल्या भल्या पतिव्रता पाहिल्या परपुरुषा रमतां । समजुनी करी विलास सखे आमुसी धरिं ममत्ता । नेघे उघड मन करून दुरुन दुरुन खुणविलें आशा जालीं ॥३॥
लागे ठसका तिला गोड बोलतां उपजे माया । वीर्यताप चेतला भ्रांती पडली भुली रे माया । मुशाफरासी म्हणे तुम्ही मंचकीं या बसा या । घालुनी गळ्यासी मिठीभोग भोगिती गोष्टी छाया । केली खातरजमा व्यास देवें जसी जैमिनीया । इतरांची काय कथा नारी मोहिती भामया । बापु म्हणे दुर्जना गुरूचें नाम घाला घाली ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.