ज्याचा सखा हरी ।
त्यावरी विश्व कृपा करीं ॥१॥

उणें पडों नेदी त्याचें ।
वारें सोसी आघाताचें ॥२॥

तयावीण क्षणभरी ।
कदा आपण नव्हे दुरी ॥३॥

आंगा आपुले ओढोनी ।
त्याला राखतो निर्वाणीं ॥४॥

ऐसा अंकित भक्तांसी ।
ह्मणे नामयाची दासी ॥५॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel