कैसे करूं ध्यान कैसा पाहों तुज ।
वर्म दावीं मज याचकासी ॥१॥

कैसी भक्ति करूं सांग तुझी सेवा ।
कोण्या भावें देवा आतुडसी ॥२॥

कैसी कीर्ती वाणूं कैसा लक्षा आणूं ।
जाणूं हा कवण कैसा तुज ॥३॥

कैसा गाऊं गीतीं कैसा ध्याऊं चित्ती ।
कैसी स्थिती मती दावी मज ॥४॥

तुका ह्मणे जैसें दास केले देवा ।
तैसें हें अनुभवा आणीं मज ॥५॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel