आधीं रचिली पंढरी । मग वैकुंठ नगरी ॥१॥

जेव्हां नव्हतें चराचर । तेव्हां होतें पंढरपुर ॥२॥

जेव्हां नव्हती गोदा गंगा । तेव्हां होती चंद्रभागा ॥३॥

चंद्रभागेचे तटीं । धन्य पंढरी गोमटी ॥४॥

नासिलीया भूमंडळ । उरे पंढरीमंडळ ॥५॥

असे सुदर्शनावरी । ह्मणूनि अविनाश पंढरी ॥६॥

नामा ह्मणे बा श्रीहरी । आह्मी नाचों पंढरपुरी ॥७॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel