कान्होबा तुझी घोंगडी चांगली ।
आह्मांसि कां दिली वांगली रे ॥१॥

स्व-गत सच्चिदानंदे मिळोनी शुद्ध सत्त्व-गुणें विणली रे ।
षड्‌-गुण गोंडे रत्‍न-जडित तुज श्याम-सुंदरा शोभली रे ॥२॥

षड्‌-विकार षड्‌-वैरी मिळोनि ताप-त्रयें जी विणली रे ।
नवा ठाईं फाटुनि गेली त्वां आह्मांसि दिधली रे ॥३॥

ऋषि मुनि ध्यातां मुखीं नाम गातां संदेह-वृत्ति विरली रे ।
बाप रखुमादेवी वरे विठ्ठले त्वत्‌-पदीं वृत्ति मुरली रे ॥४॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel