भद्रने विक्षरला वशीभूत करून जणू प्रकाशच त्याला उत्पत्तीची रहस्ये, नागांची रहस्ये आणि विकासाची रहस्ये सांगत असल्याचे भासवले आणि मग प्रकाश स्वतःच्याच तोंडाने तो स्वतःदेखील एक इच्छाधारी नाग असल्याचे कबुल केले. त्यामुळे विक्षरला आता त्याच्या पित्याबद्दल बऱ्याचशा अविश्वसनीय आणि रहस्यमयी गोष्टी समजल्या होत्या. ह्या सर्व रहस्यमयी गोष्टी विक्षरला सांगितल्याने त्याच्या पूर्वजन्मातील स्मृती जागृत व्हायला मदत मिळेल असा भद्रचा समज होता. परंतु त्याचा तो समज खोटा ठरला. त्याने प्रकाशचे रूप धारण करून विक्षरला ज्या काही गोष्टी सांगितल्या होत्या, त्यांच्यावर विक्षरचा सुरुवातीला विश्वासच बसत नव्हता. त्यामुळे तो त्याला सांगत असलेल्या गोष्टी कशाप्रकारे सत्य आहेत हे विक्षरला पटवून देण्याकरिता त्याने त्याच्यासमोर बरीच उदाहरणे देऊन त्याचे भले मोठे स्पष्टीकरण दिले, तेव्हा कुठे त्याने सांगितलेल्या गोष्टी सत्य असू शकतात अशाप्रकारचे विचार त्याच्या मनात निर्माण झाले. त्याच्या मनातील हे विचार ओळखून संधीचे सोने करण्याच्या उद्देशाने त्याने त्याचा पिता म्हणजे प्रकाशही एक इच्छाधारी नाग असल्याचे सत्य सर्वात शेवटी त्याच्या समोर आणले. ते ऐकून विक्षरला फार मोठा धक्काच बसला. ही गोष्ट कशी काय सत्य असू शकते याच विचारात तो हरवून गेला असताना भद्रला तिथे प्रकाशच्या येण्याची चाहूल लागली तसा त्याने तिथून पळ काढला.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel