सध्याचा अफगाणिस्तान म्हणजे तेव्हाचा उपगण स्थान होय असे गोळवलकर गुरुजी आपल्या लेखनात म्हणतात. २६ मे १७३९ पर्यंत अफगाणिस्तान नावाचे राष्ट्र अस्तित्वात नव्हते. दिल्लीच्या मुगल बादशाहने इराणच्या नादिर शहा सोबत तह करून उपगण स्थान त्याला सोपविला. गांधार, कम्बोज, कुंभा, वर्णु, सुवास्तु आदि क्षेत्र उपागणस्थानाचा हिस्सा होते.

इ. स. पूर्व ७०० पर्यंत येथे गांधार महाजनपदे होती. महाभारतात गांधारीचे माहेर जे म्हटले आहे ते हेच. शकुनी देखील याच देशाचा राजकुमार होता. 

अलीकडच्या काळात येथे महाभारत कालीन ५००० वर्ष जुने   विमान सापडले आहे. त्यावर संशोधन सुरु आहे.

पारशी मान्यते नुसार झरतृष्ट याने लिहिलेल्या जीन्दावेस्त या ग्रंथात या भूमीला एरीन विजो किंवा अर्यानुम विजो म्हटले आहे.

आजही अफगाणी मुलांची नावे कनिष्क, आर्यन, वेद इत्यादी ठेवली जातात.

अफगानिस्तान मधील सर्वात मोठी हॉटेल चेन आर्यांना नावाने ओळखली जाते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel