एका भगिनीने आपला स्वानुभव पाठवला आहे. कथेचा आशय प्रौढ आहे. कथा जशी पाठवली तशी फक्त नाव आणि जागा बदलून इथे प्रकाशित करण्यात आली आहे. 
--

एका छोट्या शहरातून मुंबई शहरांत मी नोकरी साठी आले. ७ च्या आंत घरांत अश्या प्रकारच्या वातावरणात वाढलेली मी आता रुमी सोबत आलिशान फ्लॅट मध्ये राहू लागले. चांगली नोकरी, भरपूर पगार ह्यामुळे जीवन अगदी मजेत होते. दिवसाची रात्र आणि रात्रीचे दिवस होत होते. काम झाल्यानंतर कुठेतरी एखादी ड्रिंक्स घ्यायला जायचे, शुक्रवारी पार्ट्या अश्या प्रकारे एक वेगळेच आयुष्य बनत गेले. सन सिटी असे आमच्या कॉलोनीचे नाव होते. प्रचडं कॉम्प्लेक्स मध्ये शेकडो फ्लॅट्स होते. कुणीतरी नवीन क्लब ओपन केला आणि आम्ही तिथे दर आठवड्याला जायला लागलो. आम्ही रहिवासी असल्याने तिथे आम्हाला फुकट प्रवेश होता तर इतर लोकांना बहुतेक वेळा फक्त ओळखीने आंत यायला मिळायचे त्यामुळे उगाच रोमियो टाईप लोकांना वाव नव्हता त्या शिवाय दारू जास्त झाली तर गाडी चालवायची गरज नव्हती.

अश्यांत माझी ओळख श्री शी झाली. श्री तेलगू होता पण लहानाचा मोठा मुंबईत झाल्याने मराठी अगदी मराठी माणसा प्रमाणे बोलायचा. त्याचे बोलणे अतिशय चांगले त्यामुळे मी त्याला अगदी सहज भुलून गेले. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले असे म्हणू शकत नाही पण त्याच्याबरोबर मी जास्त फिरायला लागले आणि कधी कधी त्याच्याच फ्लॅट वर राहायला लागले. त्याच्याविषयी सर्व माहिती मला होती फक्त त्याचा परिवार सोडून. तो आपल्या आईवडिलां विषयी किंवा भावंडं विषयी बोलायचे नेहमीच टाळायचा.

त्याने मला प्रपोस वगैरे केले तर मी काय म्हणेन असा प्रश्न मला मैत्रिणी विचारात असत आणि मी सुद्धा त्यावर कधी कधी विचार करत असे. उत्तर मला खरोखरच ठाऊक नव्हते. पण एक दिवस तो गायब झाला. अक्षरशः गायब. त्याची गाडी तशीच होती. त्याच्या मित्रांना त्याच्याविषयी काहीही माहिती नव्हती. फोन लागत नव्हता आणि ईमेल इत्यादींवरून काहीही उत्तर येत नव्हते. मी त्याच्या कामाच्या ठिकाणी जाऊन चौकशी केली तर श्री कुणाला काहीही न सांगता गायब झाला आहे असे ऐकू आले. आस्चर्यची गोष्ट म्हणजे त्याचा परिवार किंवा इतर कुणीही त्याची चौकशी करायला आले नव्हते. मी पहिली होते.

त्याच्या ऑफिस मधील लोकांनी त्याचा emergency contact होता त्याला संपर्क साधायचा प्रयन्त केला पण तो फोन सुद्धा अस्तित्वांत नव्हता असे आढळून आहे. त्याच्याबरोबर वाईट असे काही घडले कि तो मला सोडून गेला हेच मला समजेना. मी खूप खूप रडले. पोलीस मध्ये गेले तर मी कोण म्हणून काय सांगणार ? किंवा boyfriends अश्या प्रकारे पळून जातात असेही काही जणी मला समजावत होत्या.

----
३ वर्षे उलटून गेली. मी त्याला विसरून गेले होते. मी मुंबई सोडून बेंगलोर मध्ये होते. आमची कॉलोनी आता छोटी होती. मी सर्वांत वरच्या मजल्यावर मित्रां सोबत राहायचे. एका शनिवारी गॅलरी मधून मी खाली पहिले तर श्री मला दिसला. अक्षरशः तोच होता. माझा विश्वासच बसेना. "श्री...... " मी वरून ओरडले. त्याने माझ्याकडे पहिले आणि तो कावरा बावरा झाला. खाली मी पळत पळत गेले. वाटेत मनात विचार आला कि बिचारा लग्न वगैरे होऊन आला असेल तर ? मीच थोडी ओशाळले पण बाहेर गेले तर तसे काहीही नवहते. तो मला पाहून आनंदित झाला होता. तो कॉलोनीतील दुसऱ्या बिल्डिंग मध्ये राहायला आला होता आणि तो सुद्धा एकटा.

"तू असा अचानक कुठे गेलास श्री ? " मी त्याला विचारले. त्याने काहीही उत्तर दिले नाही. "कशाला जुन्या गोष्टी काढतेस ? " असे म्हणून त्याने मला हाताला धरून आपल्या फ्लॅट वर नेले. पुन्हा जणू काही तो मला काडीही भेटणार नाही अश्या तर्हेने मी त्याला चुंबन दिले आणि त्याने त्याच्या पेक्षा जास्त तीव्रतेने प्रतिसाद दिला. कुठे तरी माझ्या हृदयांत त्याच्याविषयी प्रेम होते अशी भावना निर्माण झाली. संपूर्ण दिवस आम्ही बरोबर घालवला. रात्री झाली आणि तो म्हणाला कि आता आम्ही माझ्या फ्लॅट वर जाऊ. मला ते नको होते तरी सुद्धा आम्ही माझ्या फ्लॅट वर गेलो. उगाच शेजार्यांना बोलायला नको म्हणून मी आधी गेले आणि काही वेळाने तो आला.

रात्रीचे ३ वाजले होते. मला जाग अली तर श्री बाजूला नव्हताच. मी दचकले. मी कपडे वैगैरे घालून घर भर पाहिले तर तो नव्हता. त्याचे बूट नव्हते. तो पुन्हा गेला कि काय ? मी दार उघडून खाली गेले आणि त्याच्या फ्लॅट वर जाण्याच्या तयारीत होते. इतक्यांत पोलिसांच्या ३-४ गाड्या कॉलोनीत घुसल्या. काय होतेय हे पाहावे म्हणून मी तिथेच थांबले. पोलिसांचे १० बारा लोक पळत वर गेले. खाली एक महिला पोलीस होती तिला मी विचारले कि नक्की होत काय आहे.

"तिच्या मते एक अपराधी फ्लॅट नंबर १२ मध्ये आहे". "श्री चा फ्लॅट १२ होता." मी घाबरले. इतका वेळ श्री घरी नाही म्हणून वैतागलेली मी आता तो माझ्या घरी तर नाही ना म्हणून भीत होते. परत जायला भीती वाटत होती. तरी सुद्धा मी हळूच जिन्या जवळ गेले. मी लिफ्ट मध्ये घुसणार इतक्यांत श्रीने मला मागून पकडले. "वळून नको पाहूस" त्याने अतिशय जरबेन्ट मला सांगितले आणि मी भिऊन तसेच केले. "घाबरू नकोस दि.. मी इकडचे सर्व सांभाळतो. मला माफ कर" असे शब्द मी ऐकले. लिफ्ट उघडली आणि आतून बिल्डिंगचे सेकेरेटरी महोदय बाहेर आले त्यांनी अतिशय मोठे स्मित हास्य देऊन "घाबरायचे कारण नाही, पोलीस काही तरी छोट्या चोरीची चौकशी करायला आले आहेत असे सांगितले. " मी वळून पहिले तर श्री तिथे नव्हताच.

२ दिवसांती बिल्डिंग च्या सेक्रेटरी च्या बायको कडून समजले कि श्री ने एका गुजराती व्यापार्याची ३ दिवस पूर्वी हत्या केली होती. हत्येच्या श्री सापडला नव्हता पण व्यापाऱ्याच्या शरीररक्षकांची एक गोळी त्याला लागलं होती. श्री चे शव ४ दिवसांनी एका गाडीत सापडले. गोळी शरीरांत घेऊन श्री गाडी चालवत गेला होता.

पोस्टमार्टम चा रिपोर्ट कधी कधी १-२ दिवसांनी चुकू शकतो पण गोळी ? श्री ? मला आजतागायत हे समजले नाही. मनाला धक्का लागतो तेंव्हा मेंदू त्या आठवणी पुसून काढायचा प्रयत्न करतो त्याच प्रमाणे काही आठवणी आता फारच अंधुक वाटत आहेत. पण हे लिहून कोणाला तरी सांगितले तर बरे वाटेल ह्या हेतूने तुम्हाला ईमेल पाठवलं आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel