अनेक भूत विषयी कथांत माही वाचतो कि भुताला बाटलींत वगैरे बंद केले जाते आणि कुठे जाते. खूप पुन्हा बाहेर येते आणि लोकांना छळते. शेकडो वर्षां आधी म्हणजे शिवाजी महाराजांचा जन्म सुद्धा झाला नव्हता त्या काळी मालवण परिसरांत एक परीट बाई आली. आता तुम्ही म्हणाल कि इतकी जुनी गोष्ट कोणाला कशी कळली ? त्यासाठी पुढे वाचा.

तर ह्या परीट बाईला तिच्या सावत्र आजीने खूप छळले होते. त्यामुळे वयस्क बाईचा फार तिरस्कार हि परीट बाई करत असे. मालवण परिसरांत विहीर किंवा तलावाच्या आसपास ती राहत असे आणि एखादी एकटी म्हातारी पाण्याजवळ दिसली तर तिला ती आंत ढकलून पळून जायची. तिने गावांत प्रवेश केला आणि महिन्याभरात ३ बायका बुडून मेल्या. कुणी हिच्यावर संशय घेतला नाही. परीटबाई गोरीपान होती आणि नेहमीच लाल वस्त्र धारण करून असायची. तिचे सौंदर्य चांगले असल्याने पुरुषांना वश करणे तिला फारच सोपे होते.

मालवण भागांत त्याकाळी रामेश्वर देऊळ नव्हते ते महाराजांनी नंतर बांधले त्या काळी तिथे एक शिवमंदिर होते आणि एक शैव पुजारी तिथे अर्चना करत असे. त्याची एक आई होती. पुजारी फार मोठा देवभक्त आणि मातृभक्त होता. नारळ काढण्यासाठी तो भल्या पहाटे ब्रम्ह मुहूर्तावर माडावर चढला होता आणि त्याची आई त्याच वेळी पाणी भरण्यासाठी विहिरीवर गेली. परीटबाई तिथे उपस्तिथ झाली आणि तिने आईचे पाय पकडून तिला उचलले आणि विहिरींत ढकलून दिले. हे अर्चकाने झाडावरून पहिले आणि त्याने हंबरडा फोडला. आपण पकडले गेले आहोत हे पाहून परीटबाईने तिथून पळ काढला.

अर्चकाने सरळ विहिरींना उडी घेतली. विहीर खोल होती. आई आधीच मरण पावली होती. विहिरीतून वर येण्याची काहीही सोय नव्हती. त्याने आरडा ओरडा केला पण त्या वेळी कुणीही आले नाही. सुमर ४-५ तास त्याला आपल्या आईच्या कलेवरा कडे पाहत पाण्यात राहावे लागले.

अर्चकाच्या मनावर ह्याचा प्रचंड मोठा परिणाम झाला. त्या परीटबाईला शोधून बदल घेण्याची त्याने प्रतिज्ञा केली. गांवातील सर्व मंडळींनी सगळीकडे तिचा शोध घेतला पण ती काही सापडली नाही. अर्चकाने आपले सर्व काही विकून तिचा शोध घेण्याचे काम हाती घेतले. त्याकाळी दळण वळणाच्या सोयी कमी होत्या त्यामुळे शेकडो मैल कुणी पळून जाऊ शकत नसे. खारवी समाजातील लोक नावा घेऊ कोकण किनापट्टीवरून तीव्र गतीने प्रवास करू शकत असत.

अर्चक अश्याच एका नावेतून आजूबाजूच्या ३-४ गावांत जाऊन आला. यादवांचे काही सैनिक तेंव्हा त्या मार्गाने प्रवेश करत होते. त्यांच्या बरोबर बसून दारू किंवा जुगार सुद्धा अर्चकाने खेळला. काही महिन्यातच एका गांवांत सुंदर परीटबाई काम करत आहेत हे एका सैनिका कडून त्याला समजले. सैनिकांच्या एक जथ्याला खुश करून तिने त्यांच्या घोड्यावरून फार लांबचा प्रवास केला होता. सैनिक परतत असताना हि माहिती दारूच्या नशेत त्यांनी अर्चकाला दिली.

त्या कालावधीत सूडाच्या अग्नीनें शांत स्वभावाच्या शिवभक्ताची जागा घेतली होती. अर्चकाने त्या गांवात प्रवेश केला. त्याकाळी गांवात कोणी नवीन माणूस आल्यास लोक त्याला संशयास्पद नजरेने पाहत असत म्हणून दाढी वगैरे वाढवून ह्याने संन्यासाचा वेष घेतला. आणि बाजूच्या जंगलांत लपून राहिला.

एका सकाळी परीटबाई एका तलावाच्या बाजूला कपडे दगडावर आपटून धूत होती. ते पाहून ह्याने तिच्यावर झडप घातली. आणि तिच्या मुसक्या आवळून तिला उचलून तो पळून जंगलांत गेला. आता त्याला ठाऊक नव्हते कि परीटबाईवर एका गावांतील माणसाची नजर होती आणि तो तिले भेटण्यासाठी सकाळी तिथे आला होता. त्याने हे पहिले आणि गावांत जाऊन खबर दिली. गांवातील लोक तलवारी वगैरे घेऊन जंगलांत पळाले. अर्चकाने ह्या बाईला सरळ आपल्या गुप्त ठिकाणी नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. तिला अतिशय मारले. तो पर्यंत गांवातील लोक सुद्धा तिथे पोचले. लोक आले तेंव्हा अर्चकाने तिच्या गळ्यांत फास टाकून तिला विवस्त्र करून झाडावर लटकावले होते.

लोकांनी अर्चकाला खुनी समजून बाजूला झाडावर फाशी दिले. दोघांची शरीरे तशीच ठेवून लोक परत गेले.

हि गोष्ट झाली शेकडो वर्षां पूर्वीची पण ह्या बाईचे भूत संपूर्ण परिसरांत फिरत आहे. कधी कधी हि बाई मुलांना तर वयस्क महिलांना पाण्यात सतत ढकलत असते. पण अर्चक सुद्धा वायंगी भूत प्रमाणे कुणाच्या नाही तरी कुणाच्या कानात घुसून त्यांना ह्या भुताच्या अस्तित्वाची जाणीव करून देतो. त्यामुळे अनेक वेळा सिद्ध तंत्रिकांनी परीटबाईच्या भुताला पकडले आहे. भुताला पकडणे म्हणजे जिच्या शरीरांत ती घुसली आहे तिच्यावरून भूत उतरवणे. अशी बाई हि संपूर्ण कथा पुन्हा पुन्हा विशद करते. कोंकण भागांत काही मंत्री असे आहेत ज्यांनी आपल्या आयुष्यांत हीच कथा अनेक वेळा ऐकली आहे.

अर्चकाचे भूत मात्र काढणे अवघड जाते कारण हे भूत संपूर्ण शरीराचा ताबा घेत नाही तर फक्त मनाच्या एका कोपऱ्याचा ताबा घेते. त्यामुळे त्या माणसाला वेळी अवेळी कुणी तरी कपडे धूत आहे किंवा एक पुरुष हंबरडा फोडून रडत आहे असे ऐकू येते. आवाजाचा शोध घेतला तर अनेक वेळा एकादी बाई पाण्यात जीव द्यायला जात आहे असे दिसून येऊन तिचा जीव वाचवला जातो.

अर्चकाच्या भुताला पकडण्याची जबाबदारी कर्नाटकचे सिद्ध तांत्रिक विलक्षणभैरव ह्यांनी १९७५ साली घेतली होती. त्यात ज्याच्या कानावर भूत बसले आहे त्या माणसाला सिंधुदुर्ग किल्यावर नेण्यात आले. तिथे भुताने अर्चकाची संपूर्ण कहाणी विशद केली. झाडाला आपल्या सगळ्या वस्तू (अगदी कपडे सुद्धा) मागे ठेवून परत यायचे होते पण झाडाने कानात एक सोन्याची बाळी घातली होती. ती बाळी लोभापायी त्याने काढली नाही आणि त्यामुळे त्याच्यावर बसून भूत सुद्धा परत आले.

दोन्ही भुतांचे भांडण आणि जीवित माणसांचे नुकसान असा हा प्रकार आहे.

सदर कथा श्री वीर घोलप ह्यांनी पाठवली होती. शब्दांकन आमचे आहे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel