मीर नासीर खानाने मराठ्यांना वेगवेगळ्या बलुची जमातींमध्ये वाटून दिलं. तेव्हा या बलुची जमाती त्यांना गुलाम म्हणून वागवत. त्यांच्याकडून उंटांची राखण करणे, स्वयंपाक करणे तसेच अंगमेहनतीची कामं करुन घेत. मात्र १९४४ मध्ये नबाब अकबर खान बुगटी (बुगटी जमातीचे प्रमुख सरदार) यांनी मराठ्यांची या गुलामगिरीतून मुक्तता केली. तोपर्यंत मात्र बलुचिस्तानमधील मराठ्यांना प्रचंड शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागला.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.