अमरावती हे भारतातील महाराष्ट्राच्या विदर्भ प्रदेशातील एक शहर आहे. विदर्भामध्ये प्रशासनाच्या दष्टीने दोन उपविभाग केले आहेत, नागपूर आणि अमरावती. त्यांपैकी अमरावती उपविभागामध्ये अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा व वाशीम हे जिल्हे येतात. अमरावती शहर हे महाराष्ट्रातील दाट लोकवस्ती असलेल्या महानगर क्षेत्रांमध्ये सातव्या क्रमांकावर येते. हे शहर अमरावती जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. शहरात ऐतिहासिक टप्प्यांची अंबा व श्रीकृष्ण मंदिरे आहेत.

१९८३मध्ये स्थापन अमरावती महानगरपालिका, ही "जकात खाजगी" म्हणून ओळख असलेली भारतातील पहिली महानगरपालिका आहे.

अमरावती उच्चारण हे शहर अमरावती जिल्हा तसेच अमरावती विभागाचे प्रशासकीय मुख्यालय आहे. अमरावती या शब्दाचा अर्थ पुराणातील देव [[इंद्र] याची नगरी / राजधानी असा होतो. या शहराला उमरावती असेही म्हटले जाते. अमरावती याच नावाचे एक गाव आंध्र प्रदेशातील गुंटुर जिल्ह्यात आहे.

हवामान

अमरावतीचे हवामान हे उन्हाळ्यात गरम व कोरडे आहे. येथील हिवाळा थंड व कोरडा आहे. येथे उन्हाळा मार्च ते जून, पावसाळा जुलै पासून ऑक्टोबरपर्यंत , आणि त्यानंतर मार्चपर्यंत हिवाळा असतो. सर्वाधिक तापमान २५ मे १९५४ रोजी ४६.७° सेल्शियस असे होते आणि आणि सर्वात कमी तापमान ९ फेब्रुवारी इ.स. १८८७रोजी ५.०° सेल्शियस इतके होते.

शिक्षण

अमरावती विद्यापीठ हे शहराच्या पूर्वेस आहे. पर्वतपायथ्याशी असलेले हे विद्यापीठ अतिशय नयनरम्य वातावरणात आहे. विविध प्रकारच्या झाडांनी समृद्ध असलेला याचा परिसर खूप मोठा आहे. या विद्यापीठाला आता संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ असे नाव देण्यात आले आहे. येथे संत गाडगेबाबा अध्यासन चालवले जाते.

शैक्षणिकदृष्ट्या अमरावती हे विदर्भात फार विद्यार्थिप्रिय ठिकाण आहे. येथे अनेक महाविद्यालये आहेत. शिक्षणाच्या सोईमुळे अमरावती हे पश्चिम विदर्भाचे महत्त्वाचे ठिकाण आहे यात काही नवल नाही.

शहराचे एक मोठे आकर्षण म्हणजे श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ. हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शारीरिक शिक्षण महाविद्यालय असून संपूर्ण भारतातून मुले येथे शिक्षणासाठी येतात.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel