कोल्हापूर हे महाराष्ट्राच्या दक्षिण भागातील मोठे शहर आहे. कोल्हापूरची लोकसंख्या(२००१) 39,515,415 आहे. येथील मुख्य भाषा मराठी आहे. पण तेलुगू भाषा बोलणारे अनेक लोक आहेत.

येथील महालक्ष्मी अंबाबाई मंदिर महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. पंचगंगा इथली प्रमुख नदी आहे. शहराच्या आसपास पन्हाळा, गगनबावडा, ही ठिकाणे आहेत. छत्रपती शाहूमहाराजांच्या साचा:नेमकेपण हवे काळात शहराचा मोठा विकास झाला. कोल्हापूर पैलवानांसाठीही प्रसिद्ध आहे.राष्ट्रीय ख्यातीचे खासबाग कुस्ती मैदान या शहरात आहे. विदागारातील आवृत्ती तसेच कोल्हापूरच्या चपला त्यांच्या टिकाऊपणासाठी विख्यात आहेत.

कोल्हापूरला 'कलापूर' म्हणूनही ओळ्खले जाते. बरेच नामांकित कलाकार आजपर्यंत कोल्हापूरने दिले आहेत. चित्रकला, शिल्पकला, नाटक, सिनेमा, लावणी आणि इतर लोककलांचा वारसा कोल्हापूर जतन करते आहे.

कोल्हापूरच्या हवामानात सागरी हवामान आणि जमिनीवरील हवामान यांचे मिश्रण आहे . तापमान १०° सें ते ३५° सें दरम्यान असते. शेजारील शहरांच्या तुलनेत कोल्हापूरमधील उन्हाळा तुलनेने सौम्य आहे, परंतु हवामान जास्त दमट असते. शहराच्या शेजारी पश्चिम घाट असल्यामुळे जून ते सप्टेंबर मुबलक पाऊस मिळतो. परिवहन ऑटोरिक्षा आणि महानगरपालिकेच्या बसेस लोहमार्गाने मुंबई, नागपूर, तिरुपती आणि बंगळूरकडे जाणाऱ्या गाड्या दररोज आहेत.

हवामान कोल्हापूरचे हवामान किनारपट्टी आणि देशावरील हवामानांचा संयोग आहे. वर्षभरातील तापमान १२°से. ते ३५°से. या दरम्यान असते.कोल्हापुरातील उन्हाळा शेजारच्या इतर शहरांच्या तुलनेत थंड पण जास्त दमट असतो. उन्हाळ्यातील कमाल तापमान सहसा ३८° से.च्या वर जात नाही. किमान तापमान २४° से. ते २६° से. पर्यंत असते. तापमान कमी असूनही आर्द्रतेमुळे हवा दमट आणि चिकट असते. कोल्हापूर पश्चिम घाटाजवळ असल्याने जून ते सप्टेंबर च्या दरम्यान भरपूर पाऊस पडतो. यामुळे शहराच्या सखल भागात काही दिवस पाणी शिरून पूर येतो. पावसाळ्यात तापमान २३° से. ते ३०° से. च्या दरम्यान असते. कोल्हापुरातील हिवाळा कडाक्याचा नसतो. किमान तापमान १४° से. ते १६° से. तर कमाल तापमान २९° से. ते ३२° से. पर्यंत असते. याकाळात दमटपणा कमी असल्याने हवामान उल्हासदायी असते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel