हळूहळू किती खर्च आपण वाढवून घेतलेत काही कल्पना आहे का? सकाळी उठल्यापासून.. "टूथपेस्ट में नमक" असायला पाहिजे, चारकोल असायला पाहिजे.. लौन्ग दालचिनी विलायची अजून काय काय टाकतील..! दात घासायचेत, का दातांना फोडणी द्यायचीय, काय माहिती?!
आणि सगळ्याच टूथपेस्ट "डेंटिस्ट का सुझाया नंबर वन ब्रँड" असतात.. रातभर ढिशूंम ढिशूंम..

टूथब्रश च्या ब्रिसल्स वर जितके संशोधन झालेय तितके संशोधन 'नासा'त तरी होतेय का नाही कुणास ठाऊक!! कोनें कोनें तक पहुँचने चाहिए म्हणून मग आडवे तिडवे उभे सगळे प्रकार आहेत.. असोत बापडे..
पण त्या डेंटिस्टच्या गळ्यात स्टेथो का असतो, हे मला अजून समजलं नाही..!

अंघोळीचा साबण वेगळा, चेहरा धुवायचा वेगळा.. जेल वेगळं.. फेसवॉश वेगळं.. दूध, हल्दी, चंदन आणि बादाम ने अंघोळ तर क्लिओपत्राने पण केली नसेल, पण आता गरीबातली गरीब मुलगी पण सहज करतेय..
आधी शिकेकाईने पण काम भागायचं, मग शॅम्पू आला.. मग समजलं की, शॅम्पू के बाद कंडिशनर लगाना भी जरुरी हैं..

भिंतीला प्लास्टर करणं स्वस्त आहे, पण चेहऱ्याचा मेकअप फार महागात पडतो.. पण तो केलाच पाहिजे.. नाहीतर कॉन्फिडन्स लूज होतो म्हणे.. "दाग अच्छे हैं" हे इथं का नाही लागू होत काय माहिती..

मी "गॅस, नो गॅस" करत सगळे डिओ वापरून बघितले.. पण "टेढ़ा हैं, पर मेरा हैं" म्हणत एक पण पोरगी कधी जवळ आली नाही.. खरंच.. सीधी बात, नो बकवास..

केस सिल्की हवेत, चेहरा तजेलदार हवा, त्वचा मुलायम हवी, रंग गोरा हवा, आणि परफ्यूमचा सुगंधी दरवळ हवा बस्स.. बाकी शिक्षण, संस्कार, बॉडी लँग्वेज, हुशारी हे गेलं चुलीत..!!

मला तर वाटतं, काही दिवसांतच सगळीकडे संतूर गर्ल, कॉम्प्लॅन बॉय, रॉकस्टार मॉम, आणि फेअर अँड हॅन्डसम डॅड दिसतील..

साबुन से पण किटाणू ट्रान्सफर होतें हैं म्हणे..!!
(हे म्हणजे, कीटकनाशकालाच् कीड़े लागण्यासारखं आहे!)
आता, तुमचा साबण पण स्लो असतो.. मग काय.. धुवत रहा, धुवत रहा, धुवत रहा..

टॉयलेट धुवायचा हार्पिक वेगळा,
बाथरूमसाठीचा वेगळा..! मग त्यात खुशबुदार वाटावं म्हणून ओडोनिल बसवणं आलंच.. जसं काय मुक्कामच करायचाय तिथे..

हाताने कपडे धुणार असाल तर वॉशिंग पावडर वेगळी, मशीनने धुणार असाल तर वेगळी.. नाहीतर, तुम्हारी महँगी वॉशिंगमशीन भी बकेट से ज्यादा कुछ नहीं, वगैरे...
आणि हो, कॉलर स्वच्छ करण्यासाठी वॅनिश तर पाहिजेच, आणि कपडे चमकविण्यासाठी "आया नया उजाला, चार बुंदोवाला".. विसरून कसं चालेल..?

"अगं पण दुधातलं कॅल्शियम त्याला मिळतं का?" हा प्रश्न तर एकदम चक्रावून टाकणारा आहे..
म्हणजे आदिमानवापासून जे जे फक्त दूध पीत आलेत ते सगळे महामूर्ख.. आणि त्यात हॉर्लीक्स मिसळणारेच तेवढे हुशार!! ह्यांनाच फक्त दुधातलं कॅल्शियम मिळतं..
... आणि वर, मुन्ने का हॉर्लिक्स अलग, मुन्ने की मम्मी का अलग, और मुन्ने के पापा का अलग...

"इसको लगा डाला, तो लाईफ़ झिंगालाला" म्हणून मी टाटा स्काय लावलं खरं.. पण ते एचडी नाहीये.. म्हणून मग मी घरात टिव्ही बघत असलो, की लगेच दार लावून घेतो.. न जाणो, कुठूनतरी पाचसात पोरं नाचत येतील आणि "अंकल का टिव्ही डब्बा, अंकल का टिव्ही डब्बा".. म्हणून माझ्या 40,000च्या टिव्हीला चक्क डब्बा करतील.. याची धास्तीच वाटते..

"पहले इस्तेमाल करो, फिर विश्वास करो"च्या जमान्यात आपणच खरे इस्तेमाल होतोय..  काल घेतलेल्या वस्तू, एक्सपायर व्हायच्या अगोदरच् आऊटडेटेड 
होताहेत.. 
माणसांचंही तसंच आहे म्हणा..
असो..

- Dr. T.P. Lahane
Dean, Sir J.J. Hospital.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel