हातात पेन घेऊन थोडावेळ थांबलो . आणि लिहायला सुरवात केली. काय लिहू ? काय लिहू ?

यात वेळ न घालवता मनाला येईल ते लिहायला मी सुरवात केली . पण आपण लिखाण का करायचं ? आणि इतरांनी ते का वाचायचं ? हा प्रश्नच ?
माझ्याकडे वेळ आहे म्हणून मी लिहीन पण ते इतकं चांगलं होईल कि लोक वेळ कडून वाचतील याची शास्वती मी देऊ शकत नाही.

लेखन हि एक कला आहे असं लोक मानतात. पण मला असं वाटत नाही . कारण ज्या माणसाला भावनेची जाणीव असते तो लेखन करू शकतो. अगदी निरक्षर सुद्धा .पण तरीही लिखाण कारण सोपं नाही याची प्रचिती लिहायला बसल्या शिवाय येत नाही . पण माझा मते अशी वेळ आपली तेव्हाच येते कि कोणाला आवडेल कि नाही याचा आपण विचार करतो.
लेखन करताना मनातल्या मनात होत असलेल्या उहापोहात किती मज्जा असते हे अनुभवल्या शिवाय काळत नाही . लिखाण करताना आपण लिहीत असलेले विचार , तर्क, मूल्य बरोबर आहेत कि नाही याच विचार करतो , ह्या मानसिक युद्धात रममाण व्हायला होत .

असं म्हणता कि एक चांगलं पान लेखन करायला , १०० चांगली पान वाचावी लागतात . एक चांगला लेख लिहायला १०० चांगले लेख वाचावे लागतात . असं असेल तर म माझा सारख्या कमी वाचन करणाऱ्या लोकांनी तर लिखाण करायलाच नको. मी खूप दिवस , खूप वर्ष थांबलो . कि चांगलं खूप वाचन करून मग लिहूया पान यात खूप वर्ष वाया गेली. वाचन काही झालं नाही. आणि लिखाणाची तारीख पुढे पुढे गेली. 
पण माझा मते वाचन म्हणजे केवल पुस्तकाच वाचन येवढाच वाचनाचा मर्यादित प्रकार अभिप्रेत नसावा. जीवन जगताना आत्मसाद केलेले ज्ञान हे हि वाचनच असते.माणूस जन्माला आल्या पासून ते अगदी तो मृत्यू होते परियंत वाचन करत असतो या समाजाचं , जागाच. पण त्याला जोड हवी ती सदसतविवेकबुद्धीची आणि जागरूकतेची.

लिखाणाला सुरवात करताना मी काय लिहू ? कोणत्या विषयावर लिहू ? 
कोणासाठी लिहू ? आणि काय सध्या करण्या साठी लिहू ? असे विचार मनात येतात. तरीही दोन पान लिखाण करू जर आत्मसुख मिळणार असेल तर वाटेल ते सुचेल ते लिहा . लिखाण भरकटत असले तरीही. जस आत्ता माझं होतंय तसं. खूप लोक म्हणतात रोजनिशी लिहावी. मला वाटत कि आपण पण रोजनिशी लिहावी पण त्यात काय लिहावं काही काळात नाही. आणि जे लिहितात ते आपली रोजनिशी ( diary ) दाखवत नाहीत . आणि काय लिहिलं ते सांगत पण नाहीत. म अशी diary लिहायची तरी कशाला.

मी मज्जा म्हणून असं म्हणतो कि ज्यांना काहीच येत नाही ते शेवटी लेखक होतात. असं नसून ज्यांना सजीवांचा भावनेची खरी जाण आहे तो मनुष्य लिखाण करतो.( ते पण निस्वार्थी पणे ) आजकाल लेखन कारण थोडीफार लोप पावलेली गोष्ट आहे. किंवा काहींना ती दुय्यम वाटते. कारण माणसाला अभिव्यक्त व्हायला आयते sms , कविता , चारोळी नेट वर आयत्या मिळू लागल्या आहेत. पण दुसऱ्याचा लिखाणातून माणसं स्वतःला का दर्शवतात.हि वृत्ती वाढत चालली आहे.

त्यांना असं तर वाटत नसेल कि आपण forward केलेली कविता ,लेख आपले झाले. म हीच लोक आपल्या आंतर मनात स्वतःला साहित्यिक तर समजत नसतील ? समजत पण असतील.
खरतर आत्ता मी प्रवास वर्णन लिहायला बसलो होतो.पण माझा विचारांचा प्रवास मध्येच थांबला आणि मग मी वाटेल ते लिहायला लागलो.
लेखक. बी.एम.बबलू
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel