वयांत येताना मुलांना विरुद्ध लिंगाच्या व्यक्ती बद्दल आकर्षण वाटू लागते. हे आकर्षण पूर्णतः नैसर्गिक आहे. समलिंगी लोकां मध्ये विरुद्ध लिंगा ऐवजी आपल्या लिंगाच्या व्यक्ती बद्दल प्रेम वाटते. हे सुद्धा नैसर्गिक आहे पण आपल्या समाजांत कधी कधी अश्या आकर्षणा बद्दल उघड पणे बोलणे होत नाही. समलिंगी लोक उघड पाने बोलू शकत नसल्याने त्यांना कधी कधी फार मानसिक तणाव होतो. भारतात जवळ जवळ प्रत्येक शहरांत समलिंगी लोकांची मदत करणाऱ्या अनेक संस्था आहेत. अश्या संस्थात समलिंगी लोक मदत घेऊ शकतात. 

शारीरिक आकर्षणच एक भाग असतो तो म्हणजे कल्पनाविलासांत रामणे. हे सुद्धा नैसर्गिक असले तरी ह्यामुळे आपण अभ्यासांत किंवा इतर क्षेत्रांत मागे पडत नाही ह्याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. 


आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel