*औषधयोजनेशिवाय (प्रिस्क्रिप्शनशिवाय) घेता येणारी औषधे Over The Counter Drugs (OTC Drugs)*

आतापर्यंत वाचलेल्या सर्व लेखांमध्ये तुम्ही आस पाहिलं की प्रिस्क्रिप्शनशिवाय आपण औषधे खरेदी करू शकत नाही परंतु हा नियम सर्वच औषधासाठी लागू पडत नाही. बऱ्याच देशामध्ये औषध नियामक संस्थांद्वारे अशी औषधे ज्यातील कार्यकारी तत्व (API) हे हानिकारक नाही व ते प्रिस्क्रिप्शन शिवाय वापरले जाऊ शकते आशा औषधांची यादी बनवली जाते, अशी सर्व औषधे आपण औषधयोजनेशिवाय खरेदी करू शकतो ही औषधे Over The Counter Drugs (OTC Drugs) म्हणून ओळखली जातात. ही सर्व औषधे त्यांच्या उत्पादनाच्या नावाएवजी कार्यकारी तत्त्वावरून ओळखली जातात, मात्र सौंदर्य प्रसादने ही त्यांच्या उत्पादनाच्या नावाने ब्रँड नेमनेच ओळखली जातात. OTC Drugsमध्ये  काही ठराविक औषधे,सौंदर्य प्रसादने, मलम, टूथपेस्ट,माऊथ क्लिनर, डास्टिंग पावडर, साबण, शॅम्पू, वेदनाशामक, जंतुनाशक (औषध, मलम, स्प्रे) ,प्रथमोपचार साहित्य यांचा समावेश होतो.

ही सर्व औषधे सौंदर्य प्रसादने औषधयोजनेशिवाय मिळत आली तरी ती खरेदी करण्यापूर्वी फार्मासिस्टचा सल्ला महत्वाचा ठरतो. या औषधांचा वापर, साठवणूक, परिणाम, दुष्परिणाम, औषध वापरण्याची योग्य पध्दत याबद्दल योग्य मार्गदर्शन आणि तज्ञ सल्ला केवळ फार्मासिस्टकडूनच मिळू शकतो.
OTC Drugs केवळ आशा परिस्थितीत वापरली जातात ज्यामध्ये डॉक्टरांकडून तपासण्याची आवश्यकता नसते. ही प्राथमिक स्थिती असते.

भारतामध्ये सर्दी, खोकला, डोकेदुखी, पोटदुखी, जंतुसंसर्ग, वेदनाशामक, सौंदर्य प्रसादने ही OTC Drugs म्हणून वापरली जातात.

OTC Drugs ही डॉक्टरांच्या मागणिशिवाय खरेदी करता येतात व एकच औषध सारख्या लक्षणांसाठी अनेकजन वापरु शकतात. अशी औषधे रुग्ण फार्मसीमधून स्वतःहून घेऊ शकतो परंतु यापूर्वीच सांगितल्याप्रमाणे अशी औषधे खरेदी करताना फार्मासिस्टचा सल्ला योग्य आणि फायदेशीर ठरतो.

प्रिस्क्रिप्शन सोबत घेतली जाणारी व प्रिस्क्रिप्शनशिवाय घेतली जाणारी (OTC Drugs) या दोन्हींनाही खलील नियम लागू पडतात
१)लहान मुलांनी या औषधांचा वापर पालकांच्या देखरेखीशिवाय करू नये.
२) औषध वापराबाबत सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करावे.
३)औषधांच्या वापराबाबत अथवा इतर कसलीही समस्या असल्यास त्याबाबाबत फार्मासिस्टना विचारणा करणे


OTC Drugs वापर करून देखील लक्षणांवर परिणाम झाला नसेल व लक्षणांची तीव्रता वाढली आसेल तर त्याबाबतची माहिती फार्मासिस्ट अथवा डॉक्टरांना द्यावी व योग्य तो उपचार सुरू करावा.


आशिष अरुण कर्ले.
गेहलोत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कोपरखैरणे (नवी मुंबई)
९७६५२६२९२६
ashishkarle101@gmail.com
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel