आरोग्य म्हणजे केवळ रोगाचा अभाव असणे असा नाही तर जागतिक आरोग्य संघटनेच्या व्याख्येनुसार पूर्णपणे शारीरिक,मानसिक आणि सामाजिकरित्या संतुलित स्थिती म्हणजे आरोग्य होय.

भारतातील आरोग्य व्यवस्था ही शासकीय आणि खाजगी आशा दोन गटात विभागता येईल.

भारतात सर्वव्यापी आरोग्य सेवा राज्ये व संघ राज्यक्षेत्र यांकडून पुरवली जाते. भारतिय संविधानात "लोकांचे पोषण व राहाणीमान हे वाढवणे तसेच लोकांचे आरोग्य सुधारणे ही राज्यांची मूळ जबाबदारी आहे" असे म्हटले आहे. 

शासकीय आरोग्ययंत्रणेला समांतर असणारी खाजगी आरोग्य यंत्रणा ही शासकीय आरोग्य यंत्रने पेक्षा मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय आहे.

देशातील लोकांचे आरोग्य राखण्यासाठी देशभरामध्ये प्राथमिक आरोग्य सेवा केंद्रांचे जाळे पसरले आहे.

या आरोग्य सेवा केंद्रांमध्ये नाममात्र शुल्क वापरून केस पेपर काढला जातो आणि अल्पखर्चात उपचार केले जातात याठिकाणी दिली जाणारी औषधे ही मोफत असतात.

प्राथमिक आरोग्य केंद्रांची उभारणी आणि परिचालनाबाबतचे सर्व निर्णय मात्र राज्य सरकारांची आरोग्य खाती घेतात. प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC) :- साधारणत: सहा उपकेंद्रांसाठी एक रेफरल युनिट म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र काम करते. जर लोकसंख्येचा विचार केला तर सर्वसाधारण प्रदेशात ३० हजार लोकसंख्येमागे व दुर्गम-डोंगराळ प्रदेशात २० हजार लोकसंख्येमागे एक प्राथमिक आरोग्य केंद्र असते. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात एक आरोग्य अधिकारी व त्याच्या साहाय्यासाठी १४ निमवैद्यकीय व इतर कर्मचारी असतात. प्राथमिक आरोग्य केंद्र हे २४ तास सेवा देते. स्थानिक उद्भवणाऱ्या आजरांवर नियंत्रण मिळवणे, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची अंमलबजावणी करणे, महत्त्वपूर्ण आकडेवारी गोळा करणे तसेच रेफरल व प्रयोग शाळेच्या सेवा पुरवणे इ. कार्य प्राथमिक आरोग्य केंद्र पार पाडते.

शासनातर्फे लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातात व अनेक योजना राबवल्या जातात परंतु आरोग्य सेवा केंद्रांची हलाखीची स्थिती आणि परिस्थिती तिथली व्यवस्था व स्वच्छता तसेच या यंत्रणेवरील विश्वासाचा अभाव यामुळे बऱ्यापैकी लोक हे शासकीय आरोग्य यंत्रणा ऐवजी खाजगी आरोग्य यंत्रणेला प्राधान्य देतात.

अलीकडील काळात नवनवीन धोरणांच्या माध्यमातून शासकीय आरोग्य यंत्रणेची स्थिती सुधारत आहे त्यामध्येही आधुनिक तंत्रज्ञान व साधनांचा वापर वाढला आहे अनेक आधुनिक उपकरणे ही या ठिकाणी उपलब्ध होत आहेत.

लोकांच्या आरोग्यासाठी प्राथमिक आरोग्य सेवा केंद्र वर वेगवेगळ्या आजारांच्या तपासण्या मोफत करून दिल्या जातात.

राष्ट्रीय आरोग्य मोहिमेअंतर्गत राष्ट्रीय शहरी आरोग्य मिशनला शासनाने मंजुरी दिली आहे.

या मोहिमेअंतर्गत ६० हजार व त्यापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये प्राथमिक आरोग्य सेवा केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे.


(संदर्भ विकिपीडिया,सार्वजनिक आरोग्य विभाग संकेतस्थळ)


We are Pharmacist Always Ready for Your Health Better Drugs for Better World.


आशिष अरुण कर्ले.

गेहलोत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कोपरखैरणे नवी मुंबई.

९७६५२६२९२६

ashishkarle101@gmail.com

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel