Android app on Google Play iPhone appDownload from Windows Store

 

अँटिबायोटिक (प्रतिजैविके)

सूक्ष्म जीवणूनविरुद्ध काम करणारे औषधी पदार्थ हे आजच्या काळात सर्वाधिक प्रमाणात वापरले औषध प्रकार आहे.

विकसनशील देशात वैद्यकीय यंत्रणांनी उपचारपद्धती मध्ये सर्वाधिक वापरले जाणारे परिणामकारक लोकप्रिय तसेच मोठ्या प्रमाणात गैरवापर होणारे औषध आहे...


अँटिबायोटिक (प्रतिजैविके) हा असा पदार्थ आहे जो जैविक घटकांपासून प्राप्त केला जातो जो त्याच्या सौम्य स्थितीत सूक्ष्म जिवाणूंची वाढ रोखतो अथवा त्यांना पूर्णपणे नष्ट करतो.

परंतु ही व्याख्या मर्यादित आहे यामध्ये कृत्रीमरित्या प्राप्त केलेले पदार्थ तसेच जे पदार्थ तीव्र स्थितीत काम करतात आशा पदार्थांचा समावेश होत नाही म्हणून आशा पदार्थांसाठी सूक्ष्मजीव विरोधी पदार्थ अशी सर्वसमावेशक संज्ञा वापरली जाते.


१९४० पर्यंत आपल्याकडे सूक्ष्म जीव रोगजंतू यांच्याविरोधात काम करणारे कोणतेही अस्त्र उपलब्ध नव्हते. कोणत्याही प्रकारच्या जंतूसंसर्गामुळे मृत्यू घडत होते. सर अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी ३ सप्टेंबर १९२८ रोजी पेनिसिलिन या पहिल्या प्रतिजैविकाचा शोध लावला आणि प्रतिजैविक युगाचा आरंभ झाला.


प्रतिजैविकांच्या प्रभावी परिणामामुळे त्यांचा अनिर्बंध वापर वाढला... प्रतिजैविके ही वैद्यकीय यंत्रणांना मिळालेले एक वरदान आहे मात्र त्याचा चुकीच्या पद्धतीने केलेला वापर व इतर गोष्टी यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत व ज्याचे आज अनेक दुष्परिणाम दिसून येत आहेत.

बऱ्याचदा प्रतिजैविकांची मात्रा (डोस)हा अर्धवट सोडून दिल्याने तसेच अनेकदा डॉक्टर/फार्मसिस्ट यांच्या सल्ल्याशिवाय स्वतःहून औषधे खरेदी करून वापर केल्याने औषध विरोध (ड्रॅग अपोज) होऊ शकतो.


औषध विरोध ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये आपल्या शरीरातील रोगजंतू ही स्वतःला सक्षम करतात ज्यामुळे प्रतिजैविक औषधांचा त्यांच्यावर काहीही परिणाम होत नाही ही खूप गंभीर समस्या आहे...


प्रतिजैविक औषध हे भारतीय औषध कायद्यानुसार ड्रग्ज शेड्युल एच या प्रकारात येते या प्रकारची औषधे ही रजिस्टर मेडिकल प्रॅक्टिशनरच्या कायदेशीर औषधयोजना (legal prescription) असतानाच व रजिस्टर फार्मसिस्टकडूनच खरेदी करता येतात तथापि बऱ्याचदा असे दिसून येते की सर्व नियम धाब्यावर बसवून ही औषधे विकली जातात त्यामुळे याचे अनेक दुष्परिणाम आज दिसून येत आहेत...


असे दुष्परिणाम व समस्या यांपासून दूर राहण्यासाठी प्रतिजैविक औषधांचा वापर करताना काही गोष्टींची काळजी घेणे व काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे त्याबद्दल आपण माहिती घेऊ...


प्रतिजैविक औषधांचा वापर करताना घ्यावयाची काळजी...


१)प्रतिजैविक औषधे ही डॉक्टर आणि फार्मसिस्ट यांच्या सल्ल्याने व डॉक्टरांच्या कायदेशीर औषद्योजनेनेच व रजिस्टर फार्मसिस्टकडूनच खरेदी करा.

स्वतःहून अथवा इतरांच्या सल्ल्याने खरेदी करू नका तसेच सारख्याच समस्या आहेत म्हणून इतरांना दिलेली औषधे वापरू नका.


२) आर्थिक समस्या अथवा इतर कारणे यामुळे प्रतिजैविक औषधांचा अर्धवट वापर करू नका...


३) वास्तविकपणे अँटिबायोटिक्सचा वापर कमी करायला लागावा यासाठी जंतूसंसर्ग रोखण्याचे प्रयत्न करणे आवश्यक आहे. यासाठी साबण, पाण्याने हात स्वच्छ धुणे, वैयक्तिक व सामाजिक स्वच्छता, लसीकरण, शुद्ध पाणी, सांडपाण्याची योग्य व्यवस्था असे विविध पातळ्यांवरचे सर्वश्रुत उपाय अमलात आणणे जरुरीचे आहे. 

 ४) डॉक्टर तसेच फार्मसिस्ट तसेच वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या इतर घटकांनी दोषमुक्त, तसेच रुग्णांचे आरोग्य याला प्रथम प्राधान्य देत योग्य प्रकारे वैद्यकीय सुविधा पुरवल्या पाहिजेत.

नियमांचे पालन न करता अयोग्य रीतीने बेसुमार प्रमाणात प्रतिजैविकांचा वापर, वैद्यकीय सराव किंवा औषध वितरणातील दोष या सर्वांमुळे आज आपल्याला अनेक दुष्परिणाम दिसून येत आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात औषध विरोध या समस्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

असा प्रकार टाळण्यासाठी आपण सर्व नियमांचे उल्लंघन न करता वरीलप्रमाणे काळजी घेत प्रतिजैविकांचा वापर केला पाहिजे

(संदर्भ: के डी त्रिपाठी, मराठी विकिपीडिया)

WE ARE PHARMACIST ALWAYS READY FOR YIUR HEALTH BETTER DRUGS FOR BETTER WORLD!

आशिष अरुण कर्ले.

गेहलोत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कोपरखैराने (नवी मुंबई)

ashishkarle101@gmail.com

९७६५२६२९२६

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel