बहुऔषधी उपचारपद्धती म्हणजे एकाच वेळी दोन किंवा त्यापेक्षा अधिक औषधांचा वापर करणे.

जटील रोगांवर उपचार करण्यासाठी बऱ्याचदा आशा पद्धतीचा वापर केला जातो.

मात्र आजच्या परिस्थितीत अस दिसून येत आहे की बऱ्याच वेळी आवश्यकता नसताना देखील बहुऔषधी पद्धतीचा वापर केला जातो.

काही अंशी ही उपचार पद्धती लाभदायक आहे तथापि या पद्धतीचा अभ्यास करता असे दिसून येते की यामध्ये बऱ्याच प्रमाणात अनिष्ट परिणाम/ नकारात्मक परिणाम आढळून  येतात.

वास्तविकपणे रुग्णांसाठी औषधयोजना बनवताना रुग्णांचे आरोग्य याच गोष्टीला प्रथम प्राधान्य देणे आवश्यक असते.

परंतु बऱ्याच ठिकाणी अस पाहायला मिळते की वैद्यकीय सेवा पुरवणारे डॉक्टर, फार्मसिस्ट हे लोक आपली नैतिक जबाबदारी बाजूला ठेऊन आर्थिक नफ्यासाठी गैर मार्गाचा वापर करतात. मी अस म्हणत नाही की सर्व डॉक्टर वाईट असतात आपल्या समाजात असे कित्येक डॉक्टर आहेत जे सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून सेवा पुरवतात जसे की डॉ प्रकाश आमटे, डॉक्टर अभय बंग, डॉ राणी बंग, डॉ रवींद्र कोल्हे, डॉ स्मिता कोल्हे हे लोक पैसा या गोष्टीला प्राधान्य न देता रुग्णांची सेवा त्यांचं आरोग्य या गोष्टींना महत्त्व देतात. आणि अस नाही की तुम्ही गैरमार्गाचा वापर केला तरच अधिक नफा मिळवू शकता तुम्ही जर नैतिक मार्गाचा अवलंब करून योग्य मार्गाने सेवा पुरवली तरी तुम्ही तुमच्या गरज पूर्ण करू शकता, तुम्ही जर चांगल्या प्रकारे व योग्य मार्गाने सेवा देत असाल तर तुमच्याकडे येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढून तुम्ही भरपूर नफा मिळवू शकता त्यासाठी गैरमार्गाचा वापर करणे, नैतिकता विसरून काम करणे या सर्व गोष्टींची आवश्यकता नसते.

वास्तविकपणे रुग्णांसाठी औषधयोजना बनवताना आर्थिक निकष हा खूप महत्वपूर्ण असतो विशेष करून भारतासारख्या विकसनशील देशात तसेच आफ्रिकेसारख्या अविकसित देशात हे आर्थिक निकष हा मुद्दा महत्वाचा ठरतो.

डॉक्टरांनी औषधयोजना बनवताना जी उपचारपद्धती रुग्णांना परिणामकारक ठरेल शिवाय जी त्यांना आर्थिक दृष्ट्या परवडेल या बाबींचा विचार करणे गरजेचे असते.

बऱ्याचदा असे आढळून येते की आवश्यकता नसताना देखील आर्थिक नफ्यासाठी बहुऔषध पद्धतीचा अवलंब केला जातो, रुग्णांना परवडतील अशी जेनेरिक औषधे उपलब्ध असूनदेखील महागड्या ब्रॅण्डेड औषधांचा औषद्योजनेत समावेश केला जातो ज्यामुळे बऱ्याचदा रुग्णांकडून अर्धवट औषधयोजना खरेदी करणे, पूर्ण उपचार न करणे अशा समस्या दिसून येतात.

असे गैरप्रकार टाळण्यासाठी रुग्णांना परवडतील आशा प्रकारची औषधयोजना बनवणे, ज्याठिकाणी शक्य असेल अशा ठिकाणी संयोजन उपचारपद्धती (कॉम्बिनेशन थेरपी) औषधांचा वापर करणे गरजेचे असते.

कित्येक वेळा आवश्यकता नसताना बहुऔषधी उपचारपद्धतीचा वापर केल्याने अनिष्ट परिणाम (साइड इफेक्ट) दिसून येतात...

कित्येकदा केवळ औषधच उपचारासाठी उपयुक्त ठरते असे नाही तर त्यासोबत पथ्ये, औषध घेण्याच्या योग्य वेळेचे पालन या सर्व बाबी महत्वपूर्ण ठरतात.


एखादी गोष्ट अधिक जटील बनवण्याऐवजी ती आधी सोपी बनवणे लाभदायक असते म्हणून सुरवातीला शक्य असल्यास बहुऔषधी उपचारपद्धतीचा अवलंब करू नये जिथे आवश्यक आहे अशाच ठिकाणी या पद्धतीचा वापर करावा.


अलीकडच्या काळात संयोजन उपचारपद्धतीचा वापर करत असताना अनिष्ट परिणाम उद्धभवण्याची भीती मोठ्या प्रमाणात असते याच शिवाय बहुऔषधी उपचार पद्धतीत देखील परस्पर क्रिया होऊन दुष्परिणाम दिसून येण्याची शक्यता असते म्हणून औषध योजना बनवताना या सर्व मुद्यांचा विचार करून, रुग्ण इतिहास (पेशंट हिस्ट्री) यांचा सारासार विचार करून सुरक्षित औषध योजना बनवणे गरजेचे असते...

आता तर कट प्रॅक्टिस सारखा कलंक वैद्यकीय क्षेत्राला लागलेला आहे ज्यामध्ये रुग्णांना अपूर्ण उपचारपद्धती देऊन इतर डॉक्टर कडे जाण्याचा सल्ल देणे, आवश्यकता नसताना विविध चाचण्या करायला लावणे आशा अनेक गैरमार्गाचा वापर करून दलाली (Commission) मिळवणे असा प्रकार घडतो. हा एक स्वतंत्र विषय आहे याबद्दलची माहिती आपण पुढील लेखात घेऊ.

फार्मासिस्ट तुमच्या आरोग्यासाठी...

WE ARE PHARMACIST ALWAYS READY FOR YIUR HEALTH BETTER DRUGS FOR BETTER WORLD!


आशिष अरुण कर्ले.

गेहलोत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कोपरखैराने (नवी मुंबई)

ashishkarle101@gmail.com

९७६५२६२९२६

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel