वैद्यकीय क्षेत्रात सातत्याने झालेली प्रगती औषधनिर्माणशास्त्रामधील वाढते संशोधन या सर्वांमुळे विविध औषधी घटक व औषधी पदार्थ उपलब्ध झाले आहेत. ज्यामुळे विविध आजारांवर नियंत्रण मिळवणे व समाजात चांगली आरोग्यपूर्ण सेवा पुरवणे शक्य झाले आहे तथापि या सर्व लाभांच्या तुलनेत औषधांमुळे निर्माण होणारे दुष्परिणाम, त्यावरील देखरेख ही एक मोठी समस्या निर्माण झाली आहे.


या लेखामध्ये आपण औषधांच्या दुष्परिणामासंदर्भातील तक्रार कधी कुठे व कशाप्रकारे करता येईल याची माहिती घेऊयात...


जागतिक आरोग्य संघटनेच्या व्याख्येनुसार औषधांचे दुष्परिणाम हाऔषधांचा उपचार, निदान यासाठी वापर करताना औषध वापरामुळे अनवधानाने झालेला अपायकारक परिणाम आहे.


सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने औषधांचा सुरक्षित वापर, औषधांच्या दुष्परिणामासंदर्भात देखरेख करणे pharmacovigilance या यंत्रणेद्वारे शक्य आहे.

pharmacovigilance हे असे शास्त्र व क्रिया आहेत ज्या औषध दुष्परिणामांचा शोध,मूल्यांलन, तपशीलवार अभ्यासातून अर्थबोध व अशा समस्या टाळण्यासाठी प्रयत्न करते.


भारतीय औषधकोश आयोग Indian Pharmacopoeia Commission (IPC)  गाझियाबाद कार्यरत राष्ट्रीय समन्वय केंद्र National Coordination Centre (NCC) हे भारतीय फर्माकोव्हिजिलन्स संदर्भात कार्य करण्यासाठी निर्मिती झाली आहे.

संपूर्ण देशभरात विविध रुग्णालये,संस्था यामध्ये १५० हुन अधिक केंद्र आहेत ज्यामध्ये औषध दुष्परिणाम अहवाल जमा केले जातात व त्यासंदर्भातील पुढील कार्यवाही केली जाते.


भारतीय फर्माकोव्हिजलन्स विभाग हा सर्व प्रकारच्या संशयित ज्ञात अथवा अज्ञात, वारंवार किंवा काही काळापुरते, सौम्य किंवा तीव्र तसेच दुर्मिळ यातील कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम जे अलोपॅथी तसेच पारंपरिक औषधे (आयुर्वेदिक,सिद्धा,युनानी) वापरामुळे निर्माण होऊ शकतात यांची तक्रार व अहवाल देण्यासाठी प्रोत्साहित करतात.


वैद्यकीय सेवा पुरवणारे घटक डॉक्टर(वैद्य), डेंटिस्ट(दंतवैद्य), फार्मसिस्ट(औषधनिर्माते), नर्स (परिचारिका) याचबरोबर रुग्ण यापैकी कोणीही औषध दुष्परिणाम बाबत राष्ट्रीय समन्वय केंद्र (NCC) कडे अहवाल करू शकतात.

हा अहवाल इंग्रजी, हिंदी, मराठी,गुजराती, तमिळ, बंगाली, तेलगू,कन्नड, ओरिया,आसामी आणि मल्याळम यापैकी कोणत्याही भाषेत करू शकतो.

यामध्ये दोन प्रकारचे अहवाल करता येतात पहिला संशयित औषध दुष्परिणाम आणि दुसरा औषध दुष्परिणाम या प्रकारात येतात.

आपण कार्यालयीन वेळ ९.३० ते ५.३० या वेळेत फर्माकोव्हिजिलन्स निशुल्क मदत क्रमांक १८००१८०३०२४ वर संपर्क करूनही मदत घेऊ शकतो व आपली तक्रार नोंदवू शकतो इतकेच नाही तर मोबाईल अँड्रॉइड एप माध्यमातूनही आपण अहवाल देऊ शकतो.

अँड्रॉइड ऍप लिंक

https://play.google.com/store/apps/details?id=com.vinfotech.suspectedadversedrugreaction


फार्मासिस्ट तुमच्या आरोग्यासाठी...

WE ARE PHARMACIST ALWAYS READY FOR YIUR HEALTH BETTER DRUGS FOR BETTER WORLD!


आशिष अरुण कर्ले.

गेहलोत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कोपरखैराने (नवी मुंबई)

ashishkarle101@gmail.com

९७६५२६२९२६

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel