आजकाल आजारी असल्यावर डॉक्टरकडून निदान तपासणी न करता नेट, टीव्ही किंवा इतरांकडून सल्ला घेऊन स्वतःहून औषधाचा वापर करण्याचे प्रमाण वाढत आहे...

बऱ्याच ठिकाणी एकसारखी लक्षणे दिसून आल्यावर घरतील व्यक्तींना किंवा इतर रुग्णांना दिलेल्या औषधाचा वापर केला जातो किंवा मग यापूर्वी सारख्या लक्षणांवर दिलेल्या औषधांचा वापर स्वतःहून किंवा इतरांच्या सल्ल्याने केला जातो...बऱ्याचदा  लक्षणे जरी सारखी असली तरी आजार हे वेगळे असू शकतात शिवाय वय,लिंग,वजन, रुग्णाला सुरू असणारी इतर औषधे, व्यसन यानुसार औषधाची मात्रा (डोस) बदलत असतो त्यामुळे आजारी असताना स्वतःहून औषधांचा वापर करणे धोकादायक आहे....


यापूर्वीही सेल्फ मेडिकेशन बाबत मी तपशीलवार लेख लिहिला आहे (लिंक सेल्फ मेडिकेशन: http://web.bookstruck.in/book/chapter/49766)


आतापर्यंत आपण सेल्फ मेडिकेशन कस धोकादायक ठरू शकते याबद्दल माहिती घेतली आहे पण तरीही आज भारतात का मोठ्या प्रमाणात सेल्फ मेडिकेशनचा वापर केला जातो याची माहिती घेऊयात...


आर्थिक परिस्थिती: आज डॉक्टरांकडून आकारली जाणारी भरमसाठ फी कुठेतरी सर्वसामान्य रुग्णांना सेल्फ मेडिकेशनला जबाबदार आहे...


कट प्रॅक्टिस:बऱ्याचदा दलाली कमिशन अधिक नफा यासाठी डॉक्टरांकडून योग्य प्रकारे उपचार  न करता नैतिकता बाजूला ठेऊन गैरवापर केला जातो...रुग्णांची आशा प्रकारे होणारी फसवणूक व आर्थिक लूट या गोष्टीही रुग्णांना सेल्फ मेडिकेशनकडे प्रवृत्त करतात.


ब्रॅण्डेड औषधांचा औषद्योजनेत वापर:

बऱ्याचदा स्वस्त परिणामकारक जेनेरिक औषधे उपलब्ध असूनदेखील आर्थिक नफ्यापायी ब्रँडेड औषधांचा वापर केल्यानेही रुग्ण सेल्फ मेडिकेशनचा पर्याय स्वीकारतात.


फार्मसिस्ट कडून औषध योजनेशिवाय होणारे औषधवितरण:

OTC  (Over The Counter) drugs म्हणजे औषधयोजनेशिवाय घेता येणारी औषधे फार्मसिस्ट औषधयोजनेशिवाय वितरित करू शकतो मात्र जी औषधे कायदेशीर औषधयोजनेशिवाय वितरित करता येत नाहीत अशी औषधे खुले आम वितरित केल्यामुळेही आज रुग्ण सेल्फ मेडिकेशनकडे वळत आहेत.

या शिवाय सेल्फ मेडिकेशन बाबत जितकी जनजागृती होणं गरजेचं आहे त्याबाबत फार्मसिस्ट किंवा डॉक्टर अथवा आरोग्यविषयक सेवा पुरवणाऱ्या इतर घटकांकडून जितकी जनजागृती करायला हवी तितकी होत नाही.त्यातच औषधयोजनेशिवाय खुले आम औषध विक्री केली जाते ती वेगळीच


ऑनलाईन औषधविक्री:

आज ऑनलाईन औषध विक्रीमध्ये कोणत्याही प्रकारचे नसलेले नियंत्रण व कायदेशीर औषधयोजनेशिवाय मिळणारी औषधे या गोष्टी कारणीभूत ठरत आहेत.


सेल्फ मेडिकेशनला ज्याप्रकारे आरोग्य यंत्रणा कारणीभूत ठरत आहेत तितकेच रुग्णही जबाबदार आहेत. रुग्णांनीदेखील सेल्फ मेडिकेशन टाळले पाहिजे.


रोगनिदानाशिवाय एखाद्या रुग्णाला औषध देणे हा सदोष मनुष्यवधच आहे, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले आहे.

महिला रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकपूर्व जामिनासाठी धाव घेणाऱ्या दोन डॉक्टरांच्या याचिका फेटाळताना न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले. चुकीचे रोगनिदान करणे निष्काळजीपणा असू शकतो आणि तो सदोष मनुष्यवध ठरू शकतो. तर रोगनिदानाशिवाय औषध देणे आणि त्यामुळे रुग्णाचा मृत्यू होणे हाही सदोष मनुष्यवधच आहे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

आशा घटनांना  डॉक्टर फार्मसिस्ट आणि रुग्ण  तितकेच जबाबदार आहेत.

त्यामुळे रुग्णांज सेल्फ मेडिकेशन करणं टाळावं शिवाय डॉक्टरांनी फोनवर औषध सल्ला टाळावा इतकेच नाही फार्मसिस्टनी औषधयोजनेशिवाय औषध वितरण करण टाळावं...


फार्मासिस्ट तुमच्या आरोग्यासाठी...


WE ARE PHARMACIST ALWAYS READY FOR YIUR HEALTH BETTER DRUGS FOR BETTER WORLD!

आशिष अरुण कर्ले.

गेहलोत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कोपरखैराने (नवी मुंबई)


ashishkarle101@gmail.com

९७६५२६२९२६

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel