काही दिवसांपूर्वी एका इंग्रजी वृत्तपत्रात बातमी वाचली की भगवद्गीता ही मधुमेह हा आजार बरा करण्यासाठी लाभदायक ठरू शकते...

या लेखात आपण या बतमीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

उस्मानिया जनरल रुग्णालय येथे संशोधकांनी ज्यामध्ये डॉक्टरांचा देखील सहभाग होता त्यांनी संशोधन करून असा निष्कर्ष काढला आहे की मधुमेह बरा करण्यासाठी भगवद्गीतेचे वाचन लाभदायक ठरते. भगवद्गीतेमध्ये अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण यंच्यामधील सवांद दिला आहे ज्यामध्ये अर्जुनाने प्रश्न विचारले आहेत ज्याचे भगवान श्रीकृष्णांनी उत्तर दिले आहे.

गीतेमध्ये सर्व नकारात्मक मुद्दे,प्रश्न समस्या ज्या अर्जुनाने उपस्थित केले आहे ते व त्यावर भगवान श्रीकृष्णांकडून आलेली उत्तरे यांचा समावेश आहे.

मधुमेह हा एक जीवनशैलीवर अवलंबून असणारा दुर्मिळ आजार आहे जो बरा करण्यासाठी आहार व्यायाम या गोष्टींसोबत या आजाराला झुंज देण्यासाठी भगवद्गीता वाचन तितकेच लाभदायक ठरते अस मत संशोधक आणि डॉक्टरांनी व्यक्त केलं आहे. त्यांचा हा सर्व अभ्यास आणि संशोधन इंडियन जर्नल ऑफ एन्डोक्राइनोलॉजी अँड मेटाबॉलिजम मध्ये प्रकाशित झाला आहे. हे संशोधन संशोधक आणि डॉक्टर यांनी भारतात तसेच भारताबाहेरील रुग्णालये, विविध संस्था येथे केलेल्या अभ्यासातून समोर आले आहे. विदेशी तज्ञ ज्यामध्ये ढाका वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय आणि मिडफोर्ट रुग्णालय ढाका, बांगलादेश आणि आगा खान विद्यापीठ रुग्णालय, कराची, पाकिस्तान यांचाही समावेश आहे.

भगवद्गीता ही केवळ एक धार्मिक अथवा तत्वज्ञानात्मक ग्रंथ नसून त्याहून अधिक काही आहे, ज्यामध्ये ७०० श्लोक आहेत जे जीवनातील विविध पैलूंवर उपयुक्त आणि संपूर्ण विश्वात सर्वत्र संबंधित आहे.संशोधकांनी असे म्हटले आहे की जे लोक मधुमेह या आजाराला बळी पडले आहेत त्यांच्या उपचारादरम्यान वरील गोष्टीचा समावेश केल्यास त्या रुग्णांना लाभदायक ठरतात ज्यातून वेदना तर कमी होतात शिवाय ते जीवनातील काही महत्वपूर्ण,प्रिय आणि मौल्यवान पैलूंबाबत अनुभव घेऊ शकतात. रुग्णांना या आजारावर नियंत्र मिळवण्यासाठी  आहारावर संयम,व्यायाम,जीवनशैलीत योग्य बदल,वैद्यकीय सल्ला अंमलात आणणे याबाबत प्रेरणा देणे गरजेचे आहे. केवळ स्वतःहून शरीरातील शर्करेचे प्रमाण तपासून ती नियंत्रनात आणण्यासाठी  औषधउपचार आणि संप्रेरकांचा वापर करणे तितके लाभदायक ठरत नाही. मात्र भगवद्गीतेतून केलेलं मार्गदर्शन,सल्ला आणि सकारात्मक दृष्टिकोन हा खूप लाभदायक ठरतो.


संशोधनातील काही महत्वपूर्ण मुद्दे...

१)भगवद्गीता जीवनातील नकारात्मक मनस्थिती दूर करते ज्यातून जीवनातील तणाव,क्रोध आणि वेदना दूर होतात.

२)मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी तणावरहित मन आवश्यक आहे ज्यासाठी भगवद्गीतेतील सकारात्मक दृष्टिकोन लाभदायक ठरतो.

३)स्थिर मानाशिवाय रक्तातील शर्करेचे प्रमाण नियंत्रित करणे अशक्य आहे.

४)भगवद्गीता शांत मनाच्या माध्यमातून शरीरातील संप्रेरक नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करते.

५)शारीरिक आरोग्य राखण्यासाठी भगवान श्रीकृष्ण व्यायामालाही महत्व देतात.

वास्तविकपने भगवद्गीता ही केवळ कोणत्याही विशिष्ठ धर्माचा ग्रंथ अथवा केवळ तत्वज्ञानात्मक पुस्तक नसून जीवनातील सर्व समस्या व जीवनातील प्रत्येक टप्प्यावर योग्य मार्गदर्शन करणारा एक मार्गदर्शक आहे. ज्याप्रमाणे कोणतेही नवीन उपकरण,यंत्र खरेदी केल्यावर ते कसे वापरावे याबाबत माहिती व मार्गदर्शन करणारी एक महितीपुस्तिका (user manual) असते त्याचप्रमाणे आपले हे मानवी जीवन जगण्यासाठी भगवद्गीता ही एक माहितीपुस्तिका आहे.  त्याचे लाभ आता विविध संशोधनातून पुढे येत आहेत. आंतरराष्ट्रीय कृष्णभवनामृत संघ (इस्कॉन) चे संस्थापक श्री श्रीमद ए सी भक्तीवेदांत स्वामी प्रभूपाद यांनी इंग्रजी मध्येलिहिली Bhagavad Gita As It Is मराठी(भगवद्गीता जशी आहे तशी), हिंदी, गुजराती, बंगाली कन्नड, तमिळ, फ़्रेंच, स्पॅनिश, उर्दू आशा ४० हुन अधिक भाषांत भाषांतरीत झाली असून अमेरिकेतील ९०% हुन अधिक विद्यापीठात या भगवद्गीतेचा पाठ्यपुस्तक म्हणून वापर केला जातो. आतापर्यंत ५० कोटींहून अधिक प्रती वितरित केल्या आहेत आणि हे कार्य अविरतपणे सुरू आहे.

चला तर मग आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि तणावरहित जीवन जगण्यासाठी भगवद्गीता वाचूया...

फार्मासिस्ट तुमच्या आरोग्यासाठी...

WE ARE PHARMACIST ALWAYS READY FOR YIUR HEALTH BETTER DRUGS FOR BETTER WORLD!


आशिष अरुण कर्ले.

गेहलोत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कोपरखैराने (नवी मुंबई)


ashishkarle101@gmail.com

९७६५२६२९२६

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel