एकीकडे डिजिटल इंडियाच्या माध्यमातून देशात सर्वत्र डिजिटल क्रांती होत आहे, ऑनलाइन खरेदी विक्रीमध्ये वाढ होत आहे मात्र तरीही ऑनलाइन फार्मसीला मात्र फार्मसिस्ट विरोध करत आहेत, फार्मसिस्ट कडून या ऑनलाइन फार्मसीला विरोध करत आहेत व त्यांचे मुद्दे ही योग्य आहेत परंतु याचा अर्थ असाही होत नाही की येणाऱ्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करू नये. खर तर सध्या ऑनलाइन फार्मसी सेवेमध्ये ज्या त्रुटी आहेत, त्यांचा विचार करून तसेच जे फार्मसिस्ट विरोध करतायत त्यांच्या काय समस्या आहेत त्या लक्षात घेऊन या सर्वांवर सुवर्णमध्य काढणं गरजेचं आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापरच टाळण हेही योग्य नाही शिवाय त्या नवीन तंत्रज्ञान प्रणालीच्या अतिरेकामुळे होणाऱ्या आर्थिक सामाजिक समस्याही योग्य नाहीत. या दोन्हीमधील सर्वांना हितकारक असा उपाय हाच योग्य निर्णय होईल.


का करतायत फार्मसिस्ट ऑनलाइन फार्मसीला विरोध:


ऑनलाइन फार्मसीचा रिटेल फार्मसिस्टच्या व्यवसायवर परिणाम होईल.


फार्मसिस्टच्या नोकरी व्यवसाय तसेच फार्मसी प्रोफेशनवर नकारात्मक परिणाम.


ऑनलाईन फार्मसिमध्ये प्रिस्क्रिप्शनवर तितकस नियंत्रण नाही तसेच रुग्ण समुपदेशन नाही व औषधांचा गैरवापर व अम्ली पदार्थ, नशा निर्माण करणाऱ्या औषधांचा गैरवापर होण्याची शक्यता.


आपत्कालीन स्थितीत रिटेलर फार्मसिस्टच औषध उपलब्ध करून देतो.

ऑनलाईन फार्मसीमध्ये औषधे वेळेत उपलब्ध होतीलच अस नाही.


डिस्काउंट पाहून रुग्ण ऑनलाईन फार्मसीकडे वळतात यामध्ये त्यांची काहीच चूक नसते कारण पैसा हा देखील तितकाच महत्त्वाचा मुद्दा आहे.

खर तर वरील ऑनलाईन फर्समी ला विरोध करताना फार्मसिस्ट ने मांडलेले सर्व मुद्दे महत्वाचे आणि योग्य आहेत परंतु फार्मसिस्टनी देखील या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे की आपणही काळानुसार स्वतःमध्ये बदल केले का? किती फार्मसिस्ट औषधवितरण करताना लॅबलोट (apron) घालतात, रुग्णांना औषध वापराबाबत मार्गदर्शन करतात, रुग्णांची इच्छा असेल व ब्रँडेड औषधे परवडत नसतील तर जेनेरिक औषधाच्या वापराबाबत मार्गदर्शन करतात...? फार्मसिस्टनी देखील या गोष्टीचा विचार करणे गरजेचे आहे की ऑनलाईन फार्मसी मुळे स्पर्धा वाढली आहे व ती आणखीन वढेलही मात्र या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आपण स्वतःमध्ये काय बदल करू शकतो कशा प्रकारे स्वतःच वेगळं  अस्तित्व टिकवून ठेऊ शकतो, कशा प्रकारे रुग्णांना अधिकाधिक चांगली सेवा उपलब्ध करून देऊ शकतो याचा विचार करण गरजेचं आहे. जर ऑनलाईन मध्ये ते जितका डिस्काऊंट देतात तेवढा जरी परवडत नसेल तरी आपल्याला जेवढा परवडेल तेवढा डिस्काउंट देण्यासाठी फरसमिस्टनीही विचार करणं गरजेच आहे...कारण फार्मसी हे आरोग्ययंत्रनेतील एक महत्वपूर्ण प्रोफेशन आहे हा व्यवसाय नाही की जिथं केवळ नफ्याचाच विचार केला जावा...कित्येक फार्मसिस्ट तसेच डॉक्टरदेखील व्यावसायिक नैतिक मूल्यांची जाणीव न ठेवता केवळ नफ्यासाठी मोठ्या प्रमाणात रुग्णांची लूट करतात... तर अशा सर्व चुकीच्या गोष्टी टाळून योग्य प्रकारे चांगली सेवा पुरवली तर निश्चितच कितीही स्पर्धा वाढली किंवा कितीही मोठा  डिस्काउंट इतरत्र मिळत असला तरी रुग्ण चांगली सेवा मिळणाऱ्या ठिकणालाच प्रथम प्राधान्य देतील...


आता आपण ऑनलाइन फार्मसी बाबत विचार करूयात खरच ही सुविधा वाईट आहे का? तर नाही ही सुविधा वाईट नाही गरज आहे ती फक्त त्यामुळे निर्माण होणाऱ्या त्रुटी व फार्मसिस्टच्या व्यवसायावर व फार्मसी प्रोफेशनवर होणार नकारात्मक परिणाम दूर करण्यासाठी योग्य सकारात्मक बदल करण्याची...

असा योग्य बदल करून या सिस्टीममध्ये जर फार्मसिस्टला देखील सहभागी करून घेतले तर निश्चितच ही सुविधा फार्मसिस्ट, रुग्ण, डॉक्टर आशा सर्वांनाच लाभदायक ठरेल.



फार्मासिस्ट तुमच्या आरोग्यासाठी...

WE ARE PHARMACIST ALWAYS READY FOR YIUR HEALTH BETTER DRUGS FOR BETTER WORLD!


आशिष अरुण कर्ले.

गेहलोत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कोपरखैराने (नवी मुंबई)

ashishkarle101@gmail.com

९७६५२६२९२६

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel