आपत्कालीन स्थितीत रुग्णांना रुग्णालयापर्यंत पोहचवणारे, अत्यावश्यक वैद्यकीय सुविधांनी परिपूर्ण असे वाहन अर्थातच रुग्णवाहिका!

आजच्या या लेखात आपण रुग्णवाहिकेबद्दल माहीती घेणार आहोत.

महाराष्ट्रात राज्य सरकार, केंद्र सरकार आणि भारत विकास ग्रुप (बी व्ही जी) यांच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभरात रुग्णवाहिकेची सुविधा पुरवली जाते. यामध्ये १०८ या क्रमांकावर संपर्क केल्यावर अर्ध्या तासाच्या आत रुग्णवाहिका  रुग्णाच्या सेवेत हजर होते. 

या सुविधेच्या माध्यमातून गोल्डन अवर थेअरी द्वारे सुरवातीच्या एका तासात रुग्णाला नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी पोहचवले जाते.

रुग्णवाहिका ही एक तातडीची वैद्यकीय सेवा असल्याने याद्वारे रस्ते अपघातात जखमी झालेले रुग्ण, सर्व गंभीर आजार, गंभीर गरोदर महिला, नवजात शिशु संबंधातील आजार, साथीचा रोगाचा  झालेले, नैसर्गिक आपत्तीत सापडलेले आणि मानवी जोखिमीमुळे झालेले रुग्ण, गंभीर हृदयरोगी रुग्ण, सर्पदंशाचे रुग्ण, सर्व अपघात, अन्नातून विषबाधा, श्वसनाचे रोग, मेंदूचे आजार असलेल्या रुग्णांचा समावेश होतो.

१०८ रुग्णवाहिका सेवा २४ तास वर्षाचे ३६५ दिवस सुरू असते व याद्वारे रुग्णांना मोफत सुविधा पुरवली जाते. 

रस्ते अपघात, नैसर्गिक आपत्ती, रोगाच्या साथी, गंभीर आजार व तदनुषंगिक समस्या, ह्या तातडीच्या परिस्थिती शिवाय गरोदर स्त्रिया व नवजात बालके यांच्याशी निगडीत तातडीची परिस्थिती सुद्धा हाताळली जाते.


अत्याधुनिक तंत्रज्ञान

या सर्व रुग्णवाहिका या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत व यामध्येही भौगोलिक स्थिती प्रणाली (जी पी एस), भौगोलिक माहिती प्रणाली (जी आय एस), स्वयंचलित वाहन ठावठिकाणा प्रणाली (ए व्ही एल टी)व फिरती दळणवळण सेवा (एम सी एस) यांचा समावेश आहे.


रुग्णावाहीकांमध्ये प्रगत जीवनाधार प्रणाली, म्हणजेच ALS  व प्राथमिक जीवनाधार प्रणाली, म्हणजेच  BLS ने सुसज्ज आहेत.


ह्या वैद्यकीय उपकरणांमध्ये रुग्णवाहिकेतील खाट, स्कूप स्ट्रेचर,  रेकॉर्डर  सहित बाय-फेझिक डेफिब्रीलेटर कम कार्डीयाक मॉनिटर, ( फक्त ALS करिता ). ट्रान्स्पोर्ट व्हेंटिलेटर, ( फक्त ALS करिता ), पल्स ऑक्सिमीटर ( फक्त BLS करिता ), सक्शन पंप, प्राणवायूचा सिलिंडर इत्यादीचा समावेश आहे.

ही रुग्णवाहिका वैद्यकीय कर्मचारी व प्रशिक्षित चालक असलेल्या आणीबाणीतील वैद्यकीय तंत्रज्ञाकडून परीचालीत केल्या जातील.


रुग्णवाहिकेवरील नावाची अक्षरे उलटी का असतात?

रुग्णवाहिका व त्याची अत्यावश्यकता तर सर्वांच माहीत आहे पण बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की रुग्णवाहिकेवर AMBULANCE अस उलट अक्षरांत का लिहिलेलं असत?

आपत्कालीन परिस्थितीत रुणांला  अल्प कालावधीत रुग्णालयात पोहोचवण्याची जबाबदारी रुग्णवाहिका पार पाडत असते अशावेळी रस्त्यावर इतर वहनांपेक्षा लक्ष वेधून घेणे व गर्दीतून पुढे जाण्यासाठी मार्ग मिळवणे गरजेचे असते यासाठी इतर अनेक तरतुदी असतात जसे की तिचा भडक रंग, सायरन इत्यादी याचशिवाय समोरील वाहनांना रुग्णवाहिका आहे हे लगेच समजण्यासाठी तिचे नाव उलट्या अक्षरात लिहिले जाते कारण आरशात अक्षराचे प्रतिबिंब उलटे दिसत असते त्यामुळे रुग्णवाहिकेचे नवा आधीपासूनच उलट अक्षरात लिहिले असल्याने आरश्यात ते नीट वाचता येते व रुग्णवाहिकेचे अस्तित्व समोरील वाहनचालकांना जाणवते.


आशिष अरुण कर्ले.

गेहलोत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कोपरखैराने (नवी मुंबई)

ashishkarle101@gmail.com

९७६५२६२९२६

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel