टीबीमुळे जगभरात दरवर्षी लाखो रुग्ण मृत्युमुखी पडतात. टीबी हा एड्स पेक्षाही भयंकर आजार आहे, कारण टीबीचा जीवाणू कित्येक काळ वातावरणामध्ये राहू शकतो व हा एक संसर्गजन्य आजार आहे, परंतु योग्य प्रकारे औषध उपचार घेतल्यावर हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो...

क्षयरोग (टीबी) हा एक संसर्गजन्य रोग आहे जो हवेमार्फत पसरतो व तो मायक्रोबॅक्टरियम ट्यूबरक्युलोसिस या जिवाणूच्या संसर्गाने होतो.

तुम्हाला जर तीन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधीपर्यंत खोकला असेल तर हि टीबीची लक्षणे असू शकतात...

तीन आठवड्यांपेक्षा अधिक काळ खोकला असणे व कफामधून रक्त पडणे, ताप येणे (खासकरून रात्रीच्या वेळी) व भूक मंदावणे क्षयरोगाची लक्षणे आहेत

क्षयरोगाचे निदान

क्षयरोगाचे निदान करण्यासाठी सतत तीन दिवस थुंकी तपासणे गरजेचे असते. ही तपासणी दिल्लीच्या राष्ट्रीय क्षयरोग-निदान केंद्रात तसेच देशात अनेक ठिकाणी असलेल्या डॉट्स टी.बी. केंद्रांमध्ये करता येते. अशा केंद्रांतील ही तपासणी पूर्णपणे मोफत असते.

तपासणीसाठी जोरदार खोकला काढून फक्त खाकरा देणे आवश्यक आहे. त्या ऐवजी लाळ दिली जात नाही हे पहा कारण लाळेच्या तपासणीतून क्षयरोगाचे निदान होऊ शकत नाही.

एड्सच्या रुग्णांमध्ये टीबी होण्याची शक्यता अधिक असते कारण या रुग्णांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी असते ज्यामुळे हे रुग्ण या आजाराला लगेच बळी पडतात...

लसीकरण

टी बी साठी बी सी जी ही लस उपलब्ध आहे जी जन्मतः डाव्या खांद्यावर दिली जाते...

औषधउपचार...

राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण मोहिमेअंतर्गत डॉटस् म्हणजे डायरेक्टली ऑब्झर्व्ड् ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स थेट निरीक्षण अल्पकालावधी उपचार द्वारे औषध उपचार केले जातात हे उपचार प्राथमिक उपचार सेवा केंद्रात पूर्णपणे मोफत उपलब्ध आहे

या विशेष औषध उपचार पद्धतींमध्ये औषध उपचारादरम्यान रुग्णाचे थेट निरीक्षण केले जाते तसेच त्याच्या लक्षणांवर बाबत विचारपूसही केली जाते

शिवाय टीबीवरील परिणामकारक व प्रभावी औषधांचा अखंड पुरवठा केला जातो.

टीबी हा जिवाणूंमुळे होणारा आजार असल्यामुळे यामध्ये उपचारांसाठी प्रतिजैविकांचा वापर केला जातो...

क्षयरोगाच्या जिवाणूंची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे या आजारावर वेळीच उपचार करणे गरजेचे असते शिवाय औषधांचा संपूर्ण कोर्स पूर्ण करणे गरजेचे असते

टीबी वरील औषध उपचार कालावधी जास्त असल्यामुळे  रुग्णांकडून हा संपूर्ण कोर्स पूर्ण केला जात नाही तसेच दोन ते तीन आठवड्यांपर्यंत औषध घेतल्यानंतर लक्षणे कमी होतात परंतु आजार पूर्णपणे बरा झालेला नसतो मात्र रुग्ण औषधाचा वापर मधूनच बंद करतात त्यामुळे हा आजार पुन्हा अधिक गंभीरपणे उद्भवू शकतो व यावेळी औषध विरोध परिस्थितीमुळे औषध उपचार कठीण होतात

औषध विरोध ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये जिवाणू हे स्वतः मध्ये बदल घडवून आणतात ज्याद्वारे ते प्रतिजैविकांना विरोध करतात व त्यांचा त्याच्यावर काहीही परिणाम होत नाही, यामध्ये औषध उपचार खूप कठीण होऊन बसतात!

औषध विरोध परिस्थितीमध्ये वापरता यावेत यासाठी काही ठराविक औषधे हे राखीव स्वरूपात ठेवलेली आहेत..

परंतु अशी अवघड परिस्थिती येऊ नये म्हणून औषधाचा संपूर्ण कोर्स पूर्ण करून योग्य प्रकारे उपचार पूर्ण करणे गरजेचे आहे जेणेकरून क्षयरोग हा पूर्णपणे नष्ट होईल!

डॉट्सऔषध उपचारादरम्यान घ्यावयाची काळजी

सर्व औषधांचा नियमितपणे वापर करावा 

डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय औषधांचा वापर बंद करू नये अगदी लक्षणे कमी झाली किंवा थांबली तरीही   औषधयोजना पूर्ण करावी

खोकताना किंवा शिंकताना तोंडावर रुमाल धरा.

वाटेल तेथे थुंकू नका.

घरीदेखील एखाद्या छोट्या खोक्यात थुंका व हे खोके झाकून ठेवा.

टीबी पूर्णपणे बरा होतो मात्र औषधांचा पूर्णपणे वापर करणे गरजेचे आहे

डॉट्स या विशेष उपचारपद्धतीचे फायदे

प्रभावी व परीणामकारक: या उपचार पद्धतीमध्ये जवळजवळ ९५% रुग्ण बरे होतात आतापर्यंत १७ लाख हुन अधिक रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत

ही उपचार सेवा देशातील सर्व प्राथमीक आरोग्य सेवा केंद्रात पूर्णपणे मोफत उपलब्ध आहे 

या प्राथमिक उपचार केंद्रांचे जाळे संपूर्ण भारतात दूरपर्यंत पसरले आहे ज्यामुळे ही सेवा सर्वांपर्यंत पोहचते  अगदी दुर्गम भागतही!

देशातून टीबीचे निर्मूलन करण्यामध्ये या उपचारपद्धतीची महत्वाची भूमिका आहे

ही उपचार पद्धती ही पूर्णपणे मोफत आहे जी आर्थिकदृष्ट्या परवडणारी आहे.


सारांश हाच की क्षयरोग हा एक संसर्गजन्य रोग असला तरी योग्य उपचार अंतर्गत तो पूर्णपणे बरा होऊ शकतो शिवाय राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन योजनेद्वारे यावरील औषध उपचार पूर्णपणे मोफत उपलब्ध आहे गरज आहे ती रुग्णांनी जागृत होऊन योग्य प्रकारे संपूर्ण औषधांचा कोर्स पूर्ण करणे गरजेचे आहे!

(संदर्भ: के डी त्रिपाठी, विकिपीडिया, विकासपीडिया)


फार्मासिस्ट तुमच्या आरोग्यासाठी...

WE ARE PHARMACIST ALWAYS READY FOR YIUR HEALTH BETTER DRUGS FOR BETTER WORLD!


आशिष अरुण कर्ले.

गेहलोत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कोपरखैराने (नवी मुंबई)

ashishkarle101@gmail.

९७६५२६२९२६

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel