औषध निर्मिती करताना औषधाची परीणामकता व सुरक्षितता टिकून राहावी म्हणून योग्य ती खबरदारी घेतली जाते आणि त्याचप्रमाणे औषध वापरताना येणारे दोष नाहीसे करून योग्य आणि सकारात्मक परिणाम यावेत यासाठी घरी औषधे वापरताना, त्याची साठवणूकी संदर्भात देखील योग्य ती काळजी घेणे तितकेच महत्वाचे आहे...

बऱ्याच ठिकाणी घरी औषधे ही टिव्ही जवळ,फ्रिजवर, किचनमध्ये, कपाटात कुठेही ठेवलेली असतात.

ही औषधे साठवून ठेवण्याची योग्य पध्दत नाही.

घरातील औषधांची ठेवण

औषधे ही नेहमी थंड व कोरड्या वातावरणात ठेवावी. (इथे थंड म्हणजे फ्रिजमध्ये नाही काही औषधे अतिथंड

हवामानात ठेवायची असतात तीच औषधे केवळ फ्रिजमध्ये ठेवली जातात, तशी सूचना त्या औषधाच्या बॉक्सवर दिलेली असते)

औषधे ठेवण्यासाठी एखादा छोटा स्वतंत्र बॉक्स वापरावा ज्यात बाह्य वावरची व खाण्याची औषधे वेगवेगळी ठेवावीत.

औषधांची समाप्ती तिथी वेळोवेळी तपासावी.

प्रथमोपचारासाठी लागणारी औषधे तसेच इतर औषधे जी औषधयोजनेशिवाय खरेदी करता येतात (ओ टी सी ड्रग्स) अशी औषधे एकदा वापर झाल्यावर टाकून न देता व्यवस्थीत साठवून ठेवावीत कारण बऱ्याच औषधांची समाप्ती तिथी ही २ वर्षांपर्यंत असते त्यामुळे ही औषधे आपण गरजेच्या वेळी वापरू शकतो.

केवळ औषध योजनेद्वारे घेता येणारी औषधे ही, जरी लक्षणे  सारखी आढळली तरी दुसऱ्या रुग्णाची औषधे वापरू नयेत,काही घटनांमध्ये लक्षणे जरी सारखी असली तरी आजार वेगवेगळे असू शकतात शिवाय रुग्णाचे वय, लिंग, वजन तसेच इतर गोष्टी पाहून औषधयोजना बनवलेली असते त्यामुळे औषधांची अदला बदल तसेच एक सारख्या लक्षणांसाठी एकच औषध दोन रुग्णांनी वापरणे टाळावे.आजरी असल्यास डॉक्टरांना भेटून. औषधयोजनेतील सर्व औषधे खरेदी करावीत निम्मी अथवा ठराविकच औषधे घ्यायची व काही नाही असे करू नये. औषधयोजनेनुसारच औषधे घ्यावीत औषधयोजनेशिवाय औषधे खरेदी करू नयेत.


औषध वापरताना डॉक्टर तसेच फार्मासिस्टनी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.


औषधे लहान मुले तसेच प्राण्यांपासून दूर ठेवावीत. 


औषधयोजनेवरील सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात व त्यांचे तंतोतंत पालन करावे. 


औषधांच्या पॅकिंगवरील सूचना नीट वाचून त्याची अंमलबजावणी करावी.


OTC Drugs (Over the Counter Drugs) औषधयोजनेशिवाय घेता येणारी औषधे खरेदी करताना फार्मासिस्टचा तज्ञ सल्ला व औषध वापराबाबत मार्गदर्शन घ्यावे.


लक्षणे जरी थांबली तरी औषधयोजना मध्येच थांबवू नये. औषधांचा संपूर्ण डोस पूर्ण करावा.


औषध वापरून झाल्यावर झाकण नीट बंद करावे ज्यामुळे बाहेरील वातावरणापासून संरक्षण होते व औषधाचा टिकाऊपणा टिकून राहतो.


काही औषधे साठवून ठेवण्यासांधर्भात विशेष सूचना आसतात जसे की उष्णता व प्रकाश यापासून दूर ठेवावे, थंड व कोरड्या वातावरणात ठेवावे, शीतकपाटामध्ये (फ्रिजमध्ये) ठेवावे, अथवा काही औषधे विशिष्ट तापमानात साठवून ठेवायची आसतात यांमध्ये तापमानाची नोंद केलेली असते आशा सूचनांचे योग्य प्रकारे पालन करावे.


औषध वापरानंतर काही समस्या अथवा नकारात्मक परिणाम जाणवल्यास त्यासंदर्भात तात्काळ फार्मासिस्ट व डॉक्टर यांना माहिती द्यावी.


रुग्ण समुपदेशन दरम्यान फार्मासिस्टनी दिलेल्या सूचना योग्य प्रकारे पाळाव्यात.


लहान मुलांनी नेहमी औषधांचा वापर हा पालकांच्या मार्गदर्शनाखालीच करावा.


औषधयोजनेत लिहून दिलेल्या डोसपेक्षा अधिक अथवा कमी डोस घेऊ नये.


प्रतिजैविके (anti biotics) औषधे ही नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधयोजना वापरूनच घ्यावी व आशा औषधांचा पूर्ण वापर करावा ही औषधे मध्येच थांबवू नये यामुळे औषध प्रतिरोध (Drug Opposition) सारखी समस्या निर्माण होऊ शकतो, यामध्ये भविष्यात या औषधांचा रुग्णाच्या शरीरावर परिणाम होत नाही.


तुमच्या आरोग्यविषयक सर्व समस्यांबाबत फार्मासिस्टकडून निःसंकोचपणे मार्गदर्शन आणि सल्ला घेऊ शकता.

फार्मासिस्ट तुमच्या आरोग्यासाठी...

WE ARE PHARMACIST ALWAYS READY FOR YIUR HEALTH BETTER DRUGS FOR BETTER WORLD!


आशिष अरुण कर्ले.

गेहलोत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कोपरखैराने (नवी मुंबई)

ashishkarle101@gmail.com

९७६५२६२९२६

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel