लग्न जुळवण्यापूर्वी रक्तगट पहिला जातो हे तर सर्वांनाच माहीत आहे, पण  त्यामागील शास्त्रीय कारण सर्वांनाच माहीत असतेच असे नाही शिवाय याबाबत  अनेकांच्या मनात खूप सारे गैरसमज देखील असतात...

सर्वात आधी आपण मानावी रक्तगताबद्दल जाणून घेऊ...आपण सर्वांनाच माहीत आहे की एबीओ रक्तगट प्रणालीनुसार मानवी रक्तगटाचे ए, बी, एबी आणि ओ असे चार प्रकार आहेत शिवाय रक्तात आर एच घटक आहे की नाही यावरून हे रक्तगट परत पॉझिटिव्ह अथवा निगेटिव्ह आशा प्रकारात मोडतात.

लग्नापूर्वी रक्तगटातील आरएच घटक तपासणे गरजेचे आहे...जर दोघांचेही रक्तगट पॉझिटिव्ह अथवा निगेटिव्ह असतील तर कोणतीही समस्या नाही परंतु विशेषतः जर मुलीचा रक्तगट निगेटिव्ह असेल आणि मुलाचा रक्तगट पॉझिटिव्ह असेल तर ही गंभीर समस्य ठरते या परिस्थितीत जन्माला येणाऱ्या बाळाचा रक्तगट आरएच पोसिटिव्ह असू शकतो व प्रसूती दरम्यान मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होतो, बाळाचे आणि मातेचे रक्त मिक्स होते तसेच इतर अनेक जटिल समस्या निर्माण होतात. त्यामुळे लग्नापूर्वी रक्तगट तपासणे गरजेचे आहे. या मध्ये रक्तगटातील केवळ आर एच घटक म्हणजेच रक्तगट पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह आहे हे तपासणे गरजेचे आहे आणि खास करून मुलीचा रक्तगट पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह हे तपासणे गरजेचे ठरते जर मुलीचा रक्तगट निगेटिव्ह असेल तर ही समस्या ठरते...जर दोघांचेही रक्तगट एकसारखे म्हणजेच पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असतील तर कोणतीही समस्या होत नाही...


त्यामुळे इथून पुढे लग्न जुळवताना पत्रिका जुळतात की नाही हे ओहण्याबरोबर रक्तात आरएच घटक आहे किंवा नाही म्हणजेच रक्तगट पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह हे जरूर तपासून पहा जर दोघांचेही एकसारखे म्हणजेच पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असतील तर समस्या नाही पण मुलीचा रक्तगट निगेटिव्ह असेल तर ही समस्या ठरते...

(वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीमुळे या परिस्थितीत देखील उपाय उपलब्ध आहेत यामध्ये गर्भवती मातेला आरएच प्रोटीन दिले जातात याशिवाय आरएच पॉझिटिव्ह रक्तगट रक्तसंक्रमण केले जाते.)

फार्मासिस्ट तुमच्या आरोग्यासाठी...

WE ARE PHARMACIST ALWAYS READY FOR YIUR HEALTH BETTER DRUGS FOR BETTER WORLD!

आशिष अरुण कर्ले.

गेहलोत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कोपरखैराने (नवी मुंबई)

ashishkarle101@gmail.com

९७६५२६२९२६

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel