जेनेरिक औषधे ब्रँडेड औषधांच्या तुलनेत इतकी स्वस्त का असतात व ती ब्रँडेड औषधांप्रमाणेच परिणामकारक असतात का?


जेनेरिक औषधे ब्रॅण्डेड औषधांच्या तुलनेत स्वस्त असतात पण ही औषधे खरेदी करण्यापूर्वी प्रत्येकाच्या मनात ही शंका निर्माण होते की जेनेरिक औषधे ब्रँडेड औषधांच्या तुलनेत इतकी स्वस्त का आहेत? ती ब्रँडेड औषधांप्रमाणेच परिणामकारक असतात का?


तर याच उत्तर आहे हो जेनेरिक औषधे ही देखील ब्रँडेड औषधांप्रमाणेच परिणामकारक असतात.कारण ब्रँडेड औषधे बनवणाऱ्या कंपन्यांना ज्या परवानग्यांची आवश्यकता असते,जे नियम लागू असतात ते सर्व जेनेरिक औषधे बनवणाऱ्यांना देखील लागू असतात.


जर जेनेरिक औषधे ब्रँडेड प्रमाणे परिणामकारक आहेत तर मग इतकी स्वस्त का?


जेंव्हा एखादी कंपनी नवीन औषधाचा शोध लावते तेंव्हा त्या कंपनीकडे त्याचे पेटेंट असते त्यामुळे पेटेंट संपेपर्यंत २० वर्षे केवळ तीच कंपनी ते औषध बनवू शकते बाकी इतर कंपन्यांना २० वर्षांपर्यंत ते औषध बनवता येत नाही. ज्या कंपनीने नवीन औषधाचा शोध लावला आहे त्या कंपनीला हे नवीन औषध बनवण्यासाठी मार्केट मध्ये आणण्यासाठी अनेक प्रक्रियांमधून जावे लागते (प्री फॉर्मुलेशन स्टडी, क्लिनिल ट्रायल्स) ज्यावर कित्येक लाखो रुपये खर्च होतात त्यामुळे पेटेंट असेपर्यंत म्हणजेच २० वर्षांसाठी केवळ त्याच कंपनीला हे औषध औषध बनवण्याचे अधिकार असतात त्यामुळे तीच कंपनी किंमत ठरवते.जेंव्हा २० वर्षांनंतर पेटेंट संपते तेंव्हा इतर कंपन्या देखील हे औषध बनवू शकता त्या वेळी या कंपन्यांना पुन्हा क्लिनिकल ट्रायल्स व इतर खर्चिक प्रक्रिया पुन्हा कराव्या लागत नाहीत त्यामुळे जेनेरिक औषधे स्वस्त असतात.


जेनेरिक औषधे बनवताना देखील त्या सर्व परवानग्या व नियम लागू होतात जे ब्रँडेड औषधे बनवताना लागू असतात. औषधातील घटक, कार्यकारी तत्व याची गुणवत्ता देखील ब्रँडेड औषधांप्रमाणेच असते त्यामुळे जेनेरिक औषधांच्या गुणवत्तेत व परीणामकारकतेत काहीच कमी असत नाही.

आजच्या घडीला कित्येक औषधांची पेटेंट संपली आहेत त्यामुळे अनेक औषधे ही जेनेरिक स्वरूपात उपलब्ध आहेत.


शासनाने दिलेल्या निर्णयानुसार प्रत्येक रुग्णाचा हा अधिकार आहे जर त्यांची इच्छा असेल तर ते जेनेरिक औषधांची मागणी करू शकतात.


जेनेरिक औषधे देखील ब्रँडेड औषधांपेक्षा स्वस्त व ब्रँडेड औषधांप्रमाणेच परिणामकारक असतात त्यामुळे इथून पुढे जेनेरिक औषधे खरेदी करताना कुठलीही शंका मनात ठेवू नका व जेनेरिक औषधे वापरून औषधांवर होणाऱ्या खर्चात बचत करा!


फार्मासिस्ट तुमच्या आरोग्यासाठी...


WE ARE PHARMACIST ALWAYS READY FOR YIUR HEALTH BETTER DRUGS FOR BETTER WORLD!


आशिष अरुण कर्ले.

गेहलोत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कोपरखैराने (नवी मुंबई)

९७६५२६२९२६

ashishkarle101@gmail.com

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.

Books related to फार्मासिस्ट तुमच्या आरोग्यासाठी...


Prof X Plastic. Time traveller story in Marathi.
Self help book by Anil Uadvant in Marathi
एड्स / एचआयव्ही
सुखी वैवाहिक जीवनासाठी
भांडी आणि आरोग्य
आरोग्यमय राहण्यासाठी चांगल्या सवयी
दागिने आणि आरोग्य
Vaidyakiy Sathakatha.
लॉकडाऊन , मी आणि माझं मनस्वास्थ्य
या १० खाद्य पदार्थांच्या मदतीने आपली दृष्टी सतेज आणि निरोगी राखा!
आनंदीबाई गोपाळराव जोशी