माणसाप्रमाणे बुद्धी असलेले मशीन बनवणे हे माणसाचे एक स्वप्न आहे. त्यातूनच आजचे काम्पुटर इत्यादींचा जन्म झाला आहे. हल्ली AI ने फार प्रगती केली आहे असे वाचनात येते आणि सामान्य माणसाच्या मनात त्याबद्दल कुतूहल जागृत होते त्यासाठीच हे पुस्तक लिहिले आहे.
मानवी बुद्धिमत्ता कशी काम करते ?
मानवी मेंदूंत अब्जावधी न्यूरॉन असतात. एक न्यूरॉन म्हणजे एक छोटीशी पेशी असते. सर्व मानवी संवेदना, म्हणजे आपण डोळ्यांनी काही पहिले किंवा हात लावला इत्यादी मध्ये आपले अवयव विजेचे सिग्नल्स मेंदूत न्यूरॉन कडे पाठवतात. प्रत्येक प्रकार्याच्या सिग्नलला प्रत्येक न्यूरॉन वेगळया पद्धतीने प्रतिसाद देतो. शेवटी अब्जावधी न्यूरॉन्स अश्या प्रकारे प्रत्येक संवेदना हाताळतात आणि एक विशिष्ट प्रकारचे विजेचे सिग्नल इतर अवयवांना पाठवतात. त्यामुळे गरम लागले तर हात आपण चटकरून परत घेतो, एखादी प्रेक्षणीय गोष्ट पाहत राहतो इत्यादी.
मानवी बुद्धी हि ह्याच न्यूरॉन मुळे निर्माण झाली आहे असेच एकमत आहे.