प्रिये मी मोर झालो तुझ्यासाठी
थुई थुई नाचे लग्नासाठी
रागाची गंगा अन शिव्यांची लाखोली
घरच्यांनी वाहिली अन हाणली काठी
तरी मी थुई थुई नाचलो लग्नासाठी
प्रिये मी मोर झालो तुझ्यासाठी
प्रिये मी श्वान झालो तुझ्यासाठी
भून्कतं राही अवती भवति
रागाची गंगा अन शिव्यांची लाखोली
तुचं वाहिली अन हाणली काठी
तरी मी भून्कतं राही अवती भवति
प्रिये मी श्वान झालो तुझ्यासाठी
मोर होवुनी काय जाहले
होते नव्हते धुळीस मिळाले
श्वान होवुनी काय जाहले
होत ते पण मनं पोळले
वेडा म्हणुनी ख्याती जाहली
श्रापांची शिदोरी वाढत गेली
सिद्धेश्वर विलास पाटणकर
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.