गावात एकदा दारुड्यांची
भरते मोठी सभा
सार्वमताने ठरते हे कि
पुरे झाली शोभा ॥
तारीख ठरते, जागा ठरते
जमविला जातो निधी
शेवटचा एक पेग घेऊनि
उरकूया शपथविधी ॥
लग्न असो कि मुंज कुणाची
असून देत साखरप्पुडा
तंटा होता खापर फुटते
का आला हा बेवडा ? ॥
शपथघटिका समीप येता
मागविली जाते बॉटल
करून टाकूया घेऊन एकदा
उद्यापासून सर्वदूर मंगल ॥
अजून एक आण, अजून एक आण
रात्र अशीच निघाली
शपथ बाजूला राहुनी
हळूहळू जीभपण बरळू लागली ॥
तुला कधीही अंतर नाही
यमलोकीपण नेऊ
कोण तुला रे नाही म्हणतं
त्याला पाहून घेऊ ॥
तूच सखा आम्हा बेवडयांसी
दुनिया देई श्राप
तूच माउली , दारूबाई
तूच आमुचा बाप ॥
शपथ घेतो आम्ही गावोगावी
हरेक बारमध्ये जाऊ
तुझी थोरवी गाता गाता ,
घोट घेत वर जाऊ ॥
सिद्धेश्वर विलास पाटणकर
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.