गणु अन गणूची मनू
लय भारी
गणू गोत्यात येई
मनू जाता माहेरी
मनू जाता येई मंजिरी
गणूची मंजिरी
मनू सारी
गणू नाही पाहिला
गणू नाही राहिला
गणूची येगळी दुनियादारी
कधी मनू तर कधी मंजिरी
असे हजर सदैव दारी
गणु मग्न तो
गणु भग्न तो
गणु हासतो
गणु नाचतो
मनातल्या मनात
गणु धावतो
गणु पडतो
गणु चालतो
कधी खेळतो
आतल्या आत
गणूची यातना
भेदे मना
खेळ रंगला
खेळ भंगला
गणू संपला
पंचतत्त्वात
सिद्धेश्वर विलास पाटणकर
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.