ज्ञाना ठेवु कुठं मना
तुचं तुचं दावणा
मनं अगाध अगाध
कुठं शोधून मिळणा
ज्ञाना ठेवु कुठं मना
तुचं तुचं दावणा II१II
ज्ञाना पुण्याची गणना
तुचं तुचं दावणा
वाटे अंधार माखला
दिवा शोधून मिळं ना
ज्ञाना पुण्याची गणना
तुचं तुचं दावणा II२II
ज्ञाना पापाची रचना
तुचं तुचं मोडणा
पाप तनात मनात
देई नाना यातना
ज्ञाना पापाची रचना
तुचं तुचं मोडणा II३II
झालं झालं रं कवनं
आता राहिलं मागणं
ज्ञाना मोक्षाची रं गती
तुचं तुचं दावणा
ज्ञाना ठेवु कुठं मना
तुचं तुचं दावणा II४II
II ज्ञानेश्वर माउलीचा विजय असो II
सिद्धेश्वर विलास पाटणकर
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.